LIC IPO See when LICs IPO will come and what will be the benefit to the policy holders
LIC IPO: पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना By जयदीप दाभोळकर | Published: February 3, 2021 01:58 PM2021-02-03T13:58:34+5:302021-02-03T14:03:52+5:30Join usJoin usNext भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात हा आयपीओ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठी १० टक्के आयपीओ आरक्षित असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना १० टक्के आयपीओ हा पॉलिसी धारकांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं. किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये १० टक्क्यांचं आरक्षण मिळतं संच एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठीही देण्यात येणार आहे. केवळ सरकारनंच का एलआयसीचा मालकी हक्क ठेवावा. एलआयसीचे पॉलिसी धारकही त्याचे मालक बनले पाहिजेत, असं पांडे म्हणाले. एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. याचा आयपीओ ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बसलेल्या जबर फटक्यातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि प्रकल्पांच्या आर्थिक मदतीसाठी निर्गुतवणूकीद्वारे सरकारनं १.७५ लाख कोटी रूपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकार एलआयसीच्या आयपीओसह शिपिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक लिमिटेड आणि अन्य दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचीही विक्री करण्याच्या विचारात आहे. तुहिनकांत पांडे यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने वित्त विधेयकाद्वारे भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि आयडीबीआय बँक मधील भागभांडवलाच्या निर्गुंतवणुकीसाठी आवश्यक कायदेशीर दुरुस्त्या सादर केल्या आहेत. अर्थव्यवस्थेला बसलेल्या मोठ्या फटक्यातून सावरण्यासाठी मोदी सरकारनं पुढील आर्थिक वर्षात विक्रमी भांडवली खर्चाचे लक्ष्य ठेवलं आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि एअर इंडियाच्या संभाव्य खरेदीदारांकडून सरकारला ईओआयदेखील मिळाले आहेत.टॅग्स :एलआयसीपंतप्रधाननरेंद्र मोदीबजेट 2021निर्मला सीतारामनएअर इंडियाLIC - Life Insurance Corporationprime ministerNarendra Modibudget 2021Nirmala SitaramanAir India