LIC Kanyadan Policy: एलआयसीच्या 'या' स्कीममध्ये मुलीच्या नावे दररोज गुंतवा १२१ रुपये; मॅच्युरिटीवर मिळतील २७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:33 AM2022-03-07T10:33:52+5:302022-03-07T10:38:32+5:30

LIC Kanyadan Policy: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक

LIC Kanyadan Policy: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.

या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांना बचतीचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणून या पॉलिसीला एलआयसीने कन्यादान पॉलिसी असे नाव दिले आहे. जर तुम्ही ही विशेष एलआयसी पॉलिसी घेतली तर तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी करण्याची गरज नाही. जाणून घेऊया या पॉलिसीविषयी अधिक.

यासाठी मुलीचे वय १ वर्ष आणि पालकांचे किमान वय ३० वर्षे असावे. हा प्लॅन २५ वर्षांचा असेल परंतु तुम्हाला २२ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. परंतु यामुळे पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल आणि प्रीमियम वाढेल.

परंतु या कालावधीत पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास, कुटुंबाला उर्वरित प्रीमियम भरावा लागणार नाही. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाख रुपये दिले जातील.

सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५ लाख रुपयांची रक्कम दिली जाईल. कुटुंबाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत प्रत्येक वर्षाला ५० हजार रुपयेदेखील दिले जातील.

LIC ची कन्यादान पॉलिसी सुरू करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. याशिवाय, स्वाक्षरी केलेला अर्ज आणि पहिल्या प्रीमियमसाठी चेक किंवा रोख तसेच मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज १२१ रुपये किंवा दरमहा ३६०० रुपये जमा करावे लागतील. हा प्रीमियम पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी २७ लाख रुपये मिळतील.