LIC Saral Pension: एलआयसीची जबरदस्त स्कीम...; एकदाच प्रीमियम भरा, आयुष्यभर पेन्शन मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:29 PM 2022-09-12T16:29:05+5:30 2022-09-12T16:37:06+5:30
एलआयसीच्या या नव्या प्लॅनमध्ये पॉलिसीधारकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय लाइफटाईमचा आहे, तर दुसरा पर्याय जॉइंट लाइफ लास्ट सर्व्हायव्हर अन्यूइटीचा आहे सरकारी विमा कंपनी असलेल्या LIC ने पेन्शनची योजना आखत असलेल्या लोकांसाठी एक खास प्लॅन सुरू केली आहे. LIC च्या या नव्या 'सरल पेन्शन' (LIC Saral Pension Plan) प्लॅनमध्ये पॉलिसीधारकांना केवळ एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभरासाठी एन्यूटी (Annuity) मिळेल. याचाच अर्थ असा, की आपल्याला केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि यानंतर आयुष्यभरासाठी पेन्शनची सुविधा मिळेल.
सरल पेन्शन प्लॅनमध्ये आहेत दोन पर्याय - एलआयसीच्या या नव्या प्लॅनमध्ये पॉलिसीधारकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला पर्याय लाइफटाईमचा आहे, तर दुसरा पर्याय जॉइंट लाइफ लास्ट सर्व्हायव्हर अन्यूइटीचा आहे (Joint Life Last Survivor Annuity), यात शेवटच्या जिवंत व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत प्लॅन खरेदी खर्चाच्या 100% परतावा मिळतो.
पहिल्या पर्यायात जोवर पॉलिसीहोल्डर जिवंत आहे, तोवर अॅन्यूइटी एरिअर स्वरुपात असते. पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर, अॅन्यूइटी पेमेंट तत्काळ थांबते आणि 100 टक्के रक्कम नॉमिनीला दिली जाते.
तसेच, दुसऱ्या पर्यायात पॉलिसी होल्डर अथवा त्याचा जोडिदार जिवंत असेपर्यंत एरिअरच्या स्वरुपात अॅन्यूइटी पेमेंट केले जाते. महत्वाचे म्हणजे, जॉइंट लाइफ अॅन्यूइटी पर्याय केवळ जोडिदारासोबतच घेतला जाऊ शकतो.
अशी आहे वयाची अट - एलआयसीची ही नवी योजना घेण्यासाठी किमान वय 40 वर्षे, तर कमाल वय 80 वर्षांपर्यंत असायला हवे. सरल पेन्शन योजनेंतर्गत वार्षाला, वर्षातून दोन वेळा, तीन महिन्यांतून एकदा तसेच, मासिक आधारावरही अॅन्यूइटीचा पर्याय निवडता येतो.
महत्वाचे म्हणजे, एलआयसीच्या पॉलिसी डॉक्यूमेंट (LIC Policy Document) नुसार, पॉलिसी घेतानाच पॉलिसी होल्डरला अॅन्यूइटी रेटची (LIC Pension Policy Annuity Rate) गॅरंटी दिली जाते आणि संबंधित व्यक्ती जीवंत असेपर्यंत ही रक्कम त्या व्यक्तीला मिळत असते.
असा घ्या एलआयसी पेन्शन प्लॅन - उदाहरणच द्यायचे झाल्यास, एखाद्या 60 वर्षीय व्यक्तीने 10 लाख रुपयांची गुंतवणूक करून हा प्लॅन घेतला आणि वार्षिक अॅन्यूइटी मोड चूस केला, तर त्याला पेन्शनच्या स्वरुपात 58,950 रुपये मिळतील. एलआयसीचा हा प्लॅन ऑफलाइनही खरेदी काला जाऊ शकतो. हा प्लॅन ऑनलाइन विकत घेण्यासाठी आपण एलआयसीच्या आधिकृत वेबसाइट www.licindia.in वरही व्हिजिट करू शकता.