भन्नाट परतावा अन् अनेक फायदे! ‘या’ आहेत LICच्या टॉप ५ पॉलिसी; तुम्ही केलीय का गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:01 PM2023-01-21T13:01:08+5:302023-01-21T13:06:32+5:30

LICच्या शेकडो पॉलिसींपैकी या ५ पॉलिसी बचत, गुंतवणूक आणि मोठ्या परताव्यासाठी ओळखल्या जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वांत मोठी आणि आघाडीची विमा कंपनी आहे. कोट्यवधी देशवासीयांना LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही.

तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असो, बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. सरकार लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजनाही चालवते. यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीवर चांगला परतावा मिळतो.

बचतीसोबतच तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा योजना असणेही आवश्यक आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या विमा योजनांमधून तुम्ही स्वत:साठी सर्वोत्तम योजना कशी निवडाल? कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी?

LIC च्या अशा ५ पॉलिसीबाबत जाणून घ्या, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या योजना खूप चांगल्या असल्याचे सांगितले जाते. १८ वर्षे ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. नेमक्या कोणत्या आहेत, त्या योजना? जाणून घेऊया...

ज्यांना कमी किमतीचा विमा पर्याय हवा आहे, त्यांच्यासाठी LIC जीवन अमर योजना उत्तम आहे. ही मुदत विमा पॉलिसी ठराविक कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. ज्यांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीचा विमा पर्याय हवा आहे त्यांच्यासाठी ही पॉलिसी योग्य असल्याचे सांगितले जाते. या योजनेसाठी पॉलिसीची मुदत १० ते ४० वर्षांच्या दरम्यान असू शकते. ही पॉलिसी वय १८ ते ६५ वर्षदरम्यान घेता येते.

एलआईसी टेक टर्म प्लान ही आणखी एक मुदत विमा योजना आहे. हे एका विशिष्ट कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. ज्यांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीची विमा योजना हवी आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही पॉलिसी १८ वर्षे ते ६५ वर्षे दरम्यान घेता येऊ शकते. पॉलिसीची मुदत १० ते ४० वर्षांच्या दरम्यान असू शकते.

एलआईसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसी ही लहान मुलांना वित्तीय सुरक्षा प्रदान करते. आपल्या मुलांचे भविष्य सुनिश्चित आणि सुरक्षित करण्यासाठी या पॉलिसीचा पर्याय पालकांसाठी उत्तम ठरू शकेल. या योजनेची पॉलिसी मुदत २५ वर्षे आहे. ही पॉलिसी बाळाच्या जन्मापासून ते वय वर्ष १२ पर्यंत घेतली जाऊ शकते.

एलआईसी न्यू जीवन आनंद ही पॉलिसी सुरक्षा आणि बचत दोन्ही प्रदान करते. ज्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करून भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे. ही पॉलिसी १८ वर्षे ते ५० वर्षे दरम्यान घेता येऊ शकते. पॉलिसीची मुदत १५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान कुठेही असू शकते.

एलआईसी जीवन उमंग ही संपूर्ण जीवन प्लस योजना विमाधारकाला त्याच्या आयुष्याच्या कालावधीसाठी सुरक्षा प्रदान करते. ज्यांना लाइफ कव्हर हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे, जी बचतीचा पर्यायही देते. ही पॉलिसी 90 दिवस ते ५५ वर्षादरम्यान घेऊ शकतो. (टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)