LIC Aadhaarshila Policy : रोज २९ रुपयांची बचत करा आणि सुरक्षित भविष्यासह लाखो रुपये रिटर्न मिळवा By बाळकृष्ण परब | Published: February 10, 2021 11:55 AM 2021-02-10T11:55:20+5:30 2021-02-10T12:28:34+5:30
LIC Aadhaar shila Policy : आजच्या काळात महिलांसाठीही अशी गुंतवणूक करणे विशेष गरजेचे बनले आहे. त्यामुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत. आजच्या काळात सुरक्षित भविष्यासाठीची तरतूद करणे हे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण बनलेले आहे. त्यात महिलांसाठीही अशी गुंतवणूक करणे विशेष गरजेचे बनले आहे. त्यामुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत.
अशा महिलांसाठी आता एलआयसीची आधारशिला पॉलिसी हा उत्तम पर्याय ठरणार आहे. या पॉलिसीमध्ये दररोज २९ रुपये जमा करून महिला लाखो रुपयांचा लाभ घेऊ शकतात. ही पॉलिसी नेमकी कशी आहे. त्यात कशाप्रकारे गुंतवणूक करता येते, याचा घेतलेला हा आढावा.
काय आहे आधारशिला पॉलिसी जर तुम्ही आधारशिला पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये तुम्हाला चांगल्या कव्हरेजसह चांगल्याप्रकारे बचतही करता येणार आहे. आठ ते ५५ या वयोगटातील महिला या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतील. पॉलिसीदरम्यान, जर गुंतवणुकदाराचा मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकेल.
किती असेल प्रीमियम या पॉलिसीचा लाभ घेतल्यावर त्याचा प्रीमियम हा महिलेचे वय आणि पॉलिसीच्या अवधीवर अवलंबून असेल. जर कुणी वयाच्या ३१ व्या वर्षी २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ४.५ टक्के करासह पहिल्या वर्षीया प्रीमियम १० हजार ९५९ रुपये एवढा भरावा लागेल. पहिल्या वर्षीच्या प्रीमियमनंतर ही रक्कम १० हजार ७२३ रुपये एवढी होईल. त्यामुळे दररोज किमान २९ रुपयांची बचत करावी लागेल. असे एकूण २ लाख १४ हजार ६९६ रुपये जमा होतील. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला ३.९७ लाख रुपये मिळतील. त्याशिवाय या पॉलिसीमधून तुम्हाला डेथ बेनिफिटही मिळेल.
१५ दिवसांत रद्द करू शकता पॉलिसी एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला ही पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधाही मिळणार आहे. जर काही कारणाने तुम्हाला ही पॉलिसी रद्द करायची असेल तर प्लॅन घेतल्यानंर १५ दिवसांत तुम्ही ही पॉलिसी रद्द करू शकता.