LIC Saral Pension Yojana : एलआयसीची विशेष स्कीम, एकदा पैसे भरा आणि आयुष्यभर होणार नाही मंथली इन्कमचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:01 PM2022-11-25T17:01:10+5:302022-11-25T17:07:00+5:30

LIC Saral Pension Yojana : पाहा कोणती आहे एलआयसीची ही स्कीम आणि काय आहे यात खास.

LIC Saral Pension Yojana : तुम्हालाही निवृत्तीनंतरच्या चांगल्या भविष्याची काळजी वाटत असेल, तर LIC ची साधी पेन्शन योजना नक्कीच तुमच्या फायद्याची ठरू शकते. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी स्कीम चालवते. वृद्धांसाठी एक एलआयसी सरल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

ही एक अशी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कमी कालावधीतही पेन्शनचा लाभ मिळू शकतो. यासाठी वयाच्या ६० वर्षापर्यंत थांबण्याची गरज नाही. वयाच्या ४० व्या वर्षापासून पेन्शन मिळू लागते. या प्लॅनमध्ये, पॉलिसी घेताना तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल.

या स्कीम अंतर्गत एन्युटी मिळवण्यासाठी २ पर्यायांपैकी एक कोणताही पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते. जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू जाला तर त्याच्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत केली जाते. सरल पेन्शन योजनेमध्ये पॉलिसी घेतल्यानंतरच पेन्शन मिळण्यास सुरूवात होते. पॉलिसी घेताना जितक्या रकमेपासून सुरूवात होते, तितकीच रक्कम यात आयुष्यभर मिळत राहते.

सिंगल लाईफ पॉलिसी कोणत्या एका व्यक्तीच्या नावावर असते. पॉलिसी होल्डरला रक्कम पेन्शनच्या रुपात मिळत राहते. पेन्शन होल्डरच्या मृत्यूनंतर बेस प्रीमिअमची रक्कम नॉमिनीला परत केली जाते.

जॉईंट लाइफ पॉलिसीमध्ये दोन जण पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. जोपर्यंत प्रायमरी पेन्शन होल्डर हयात आहे तोवर पेन्शन मिळत राहिल. त्यानंतर बेस प्रीमिअमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय ४० वर्षे आणि कमाल वय ८० वर्षे असणे अनिवार्य आहे. हा एक होल लाईफ फॅमिली प्लॅन आहे. पॉलिसी घेतल्यानंतर ६ महिन्यांनी ती सरंडरही करता येते.

प्रीमिअम भरल्यानंतर वार्षिक, तिमाही, सहामाही आधारावर पेन्शन मिळवू शकतो. तसंच पॉलिसी सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर यावर तुम्ही लोनही घेऊ शकता. जर कोणतीही व्यक्ती रिटायर झाली असेल तर रियाटरमेंट दरम्यान मिळालेल्या पैशांनी यात गुंतवणूक करता येईल. जर कोणी यात एकरमकी गुंतवणूकीतू एन्युटी घेतली तर त्याला पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल.

एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार कोणतीही व्यक्ती ४२ व्या वर्षी ३० लाखांची एन्युटी घेतो तर त्याला महिन्याला १२३८८ रुपये पेन्शन म्हणून मिळतात. तुम्ही सहा महिन्यांनीदेखील पेन्शन घेऊ शकता. यामध्ये किंमान तुम्ही १ हजार रूपये पेन्शन घेऊ शकता. याचाच अर्थ ३ महिन्याला ३ हजार, ६ महिन्याला ६ हजार आणि १२ महिन्याला १२ हजारांचं पेन्शम मिळेल.