LIC Scheme : फक्त 12 वर्षांचा कालावधी; मासिक 1 लाख रुपये पेन्शन, पाहा LIC ची 'पैसा वसूल' योजना...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:37 PM2023-02-22T20:37:59+5:302023-02-22T20:40:44+5:30

LIC कडे सर्व स्तरातील ग्राहकांसाठी विविध योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत.

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC, मध्यम आणि निम्नवर्गीय कुटुंबांसह श्रीमंतांसाठीही चांगल्या योजना आणत असते. 'LIC जीवन शांती' नावाची अशीच एक योजना आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांना कमी कालावधीत भरगच्च पेन्शन हवी आहे.

तुम्हाला जीवन शांती योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळू शकते. LIC ने अलीकडेच भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वार्षिक दर अपडेट केले आहेत. याचा अर्थ आता पॉलिसीधारकांना त्यांच्या प्रीमियमच्या बदल्यात अधिक पेन्शन मिळेल.

ज्यांना दरमहा, तीन महिन्याला, 6 महिन्याला किंवा वर्षाला नियमित उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ज्या लोकांचा मानस लवकर निवृत्त होण्याचा आणि आरामदायी जीवन जगण्याचा आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

याचे कारण म्हणजे, फक्त 12 वर्षांच्या गुंतवणुकूवर ग्राहकाला पेन्शन मिळणे सुरू होते. तुम्ही भरलेल्या प्रीमियमनुसार तुम्हाला पेन्शन मिळेल. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला चांगली मासिक पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला मोठी रक्कम द्यावी लागेल.

जर तुम्हाला दरमहा 1.06 लाख रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला 12 वर्षांसाठी 1 कोटी रुपये गुंतवावे लागतील. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला 10 वर्षानंतरच पेन्शन घेणे सुरू करायची असेल, तर तुम्हाला दरमहा 94,840 रुपये पेन्शन मिळेल.

50,000 रुपयांच्या मासिक पेन्शनमध्ये तुमचे भागत असेल, तर तुम्हाला 50 लाख रुपये गुंतवावे लागतील. 12 वर्षांसाठी 50 लाख रुपये जमा केल्यानंतर, तुम्हाला 53,460 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. यामध्ये तुम्हाला किमान 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. 12 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल.

यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे आहे तर, कमाल वयोमर्यादा 100 वर्षांपर्यंत आहे. परंतु ही मर्यादा वेगवेगळ्या पर्यायांसाठी बदलते. याची एक मर्यादा 79, दुसरी 85 आणि तिसरी 100 वर्षे आहे. ही योजना संयुक्तपणे देखील खरेदी केली जाऊ शकते. एका खातेदाराचा मृत्यू झाला तर दुसऱ्या खातेदाराला पैसे मिळत राहतील. दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पैसे परत केले जातील.