Saving Tips: महिलांसाठी LIC चा जबरदस्त प्लॅन; पॉलिसीसाठी फक्त आधार कार्ड लागणार, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:54 PM 2021-08-05T16:54:12+5:30 2021-08-05T17:02:14+5:30
LIC Policy for women's: एलआयसी आधार शिला प्लॅनमध्ये सिक्युरिटी आणि सेव्हिंग दोन्ही सुविधा आहेत. या स्कीमचा फायदा केवळ त्याच महिला घेऊ शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने समाजातील प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येकाच्या गरजेनुसार पैसे गुंतवणुकीच्या, पेन्शनच्या योजना आणल्या आहेत. सोबतच विम्याचे संरक्षणही पुरविते. (lic aadhaar shila plan 944)
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी एलआयसीने एक खास स्कीम आणली आहे. एलआयसीच्या या स्कीमचे नाव 'आधार शिला प्लॅन' असे आहे. ज्याचा लाभ 8 वर्षे ते 55 वर्षे वयाच्या महिला घेऊ शकतात.
एलआयसी आधार शिला प्लॅनमध्ये सिक्युरिटी आणि सेव्हिंग दोन्ही सुविधा आहेत. या स्कीमचा फायदा केवळ त्याच महिला घेऊ शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे.
आधार शिला प्लॅन मॅच्युअर होण्याच्या आधी जर त्या महिला पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. जर पॉलिसीधारक महिला पॉलिसी मॅच्य़ुअर होईपर्यंत जिवंत असेल तर तिला एकरकमी पैसे मिळतात.
काय आहे नियम एलआयसी आधार शिला प्लॅननुसार बेसिक सम अश्युअर्ड मिनिमम रक्कम 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये आहे. पॉलिसी टर्म कमीतकमी 10 वर्षे आणि जास्तीतजास्त 20 वर्षे आहे.
या प्लॅनमध्ये मॅच्य़ुरिटीचे वय हे 70 वर्षे आहे. हा प्लॅन अशा महिलांसाठी आहे ज्या आरोग्यवान आहेत आणि त्यांना कोणतीही मेडिकल टेस्ट करण्याची गरज नाही.
या प्लॅनचा प्रिमियम म्हणजेच हप्ता हा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असा भरता येतो. महिलांसाठी खासकरून तयार करण्यात आलेल्या या प्रिमियम, मॅच्युरिटी क्लेम आणि डेथ क्लेमवर कर सवलत देखील मिळते.
महत्वाचे... जर पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षांनी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर मॅच्युरिटीवर लॉयल्टी अॅडिशनची सुविधा मिळते. अॅक्सिडंट बेनिफिट रायडरदेखील आहे.
डेथ बेनिफिटची रक्कम.. पॉलिसी संपण्याआधीच महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या वारसाला वार्षिक प्रिमिअमच्या 10 पट अधिक किंवा सर्व हप्त्यांच्या 105 टक्के रक्कम मिळणार आहे.
पॉलिसी मॅच्युअर झाली तरी देखील जर महिलेने सर्व हप्ते भरलेले असतील तरच तिला मॅच्युरिटी रक्कम मिळणार आहे. यामुळे एखादा हप्ता चुकवला तर पैसे मिळणार नाहीत.