Life Insurance: एक रुपयात काय मिळते? आता माचिसही नाही, पण दोन लाखांचा विमा जरूर मिळेल By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:22 PM 2021-12-22T17:22:26+5:30 2021-12-22T17:35:05+5:30
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana in Marathi: जर तुम्हाला आजच्या तारखेला विचारले की, एक रुपयात काय मिळते. तुम्ही म्हणाल चॉकलेट किंवा काही नाही. आता एका माचिसच्या पेटीची किंमतही दोन रुपये झाली आहे. जर तुम्हाला आजच्या तारखेला विचारले की, एक रुपयात काय मिळते. तुम्ही म्हणाल चॉकलेट किंवा काही नाही. आता एका माचिसच्या पेटीची किंमतही दोन रुपये झाली आहे. पण या एका रुपयात तुम्हाला दोन लाखांचा इन्शुरन्स विकत घेता येणार आहे.
Pmsby Benefits: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रत्येकाला विम्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा विमा योजना लाँच केली होती. याद्वारे सरकार खूप कमी किंमतीत जीवन विमा प्रदान करते.
PMSBY च्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील लोकांना विमा योजनांचा लाभ मिळावा, हा सरकारचा उद्देश आहे. त्याचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे, म्हणजेच महिन्यानुसार पाहिल्यास, फक्त 1 रुपये मासिक प्रीमियम बसतो. सरकारच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश लोकांना कठीण काळात मदत करणे हा आहे.
काय आहेत फायदे... अपघाती मृत्यू किंवा विमाधारकाचे संपूर्ण अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे. कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय, एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय गमावल्यास पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी १ जून ते पुढील वर्षीच्या ३१ मे पर्यंत आहे.
प्रीमियम कसा भरायचा? 18 ते 70 वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास, तुम्ही ही योजना फक्त एकाच बँकेतून घेऊ शकता. दरवर्षी १ जून रोजी किंवा त्यापूर्वी एका हप्त्यात 'ऑटो डेबिट' सुविधेद्वारे तुमच्या बँक खात्यातून रक्कम कापली जाईल.
PMSBY शी संबंधित संपूर्ण माहिती येथे मिळेल तुम्ही PMSBY दावा फॉर्म (https://www.jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx) येथे डाउनलोड करू शकता. हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेतील फॉर्मसाठी तुम्ही या लिंकवर (https://www.jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx) क्लिक करू शकता. अधिक तपशिलांसाठी तुम्ही टोल-फ्री नंबर (1800-180-1111/1800-110-001) वर देखील संपर्क साधू शकता.