स्वस्त गृहकर्जाच्या शोधात आहात? या बँका आहेत भारी! बघा लिस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:53 AM 2022-11-21T11:53:58+5:30 2022-11-21T12:01:42+5:30
सध्या अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ईएमआय अथवा वर्षे नक्की वाढली असणार. या स्थितीत सर्वात स्वस्त गृहकर्ज कोणती बँक देत आहे ते जाणून घेऊ... गृहकर्ज तुम्हाला घराचे मालक बनण्याची आणि कर सवलतीचे फायदे मिळवण्याची मोठी संधी देते. घरामुळे तुमच्याकडे एक मोठी मालमत्ताही तयार होते. सध्या अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ईएमआय अथवा वर्षे नक्की वाढली असणार. या स्थितीत सर्वात स्वस्त गृहकर्ज कोणती बँक देत आहे ते जाणून घेऊ...
आपली गरज किती? तुम्हाला तुमच्या गरजेची आणि पात्रतेची कल्पना असायला हवी. तुम्ही जास्त कर्ज रकमेसाठी अर्ज केल्यास ज्यासाठी तुम्ही पात्र नसाल, तर बँक तुमचा कर्ज अर्ज नाकारते. बँकेची ही कृती टाळण्यासाठी तुमची कर्जाची पात्रता एकदा तपासून पाहा. यामुळे तुमच्यासाठी डाऊन पेमेंटसाठी रक्कम तयार करणे सोपे होईल.
आपली क्षमता ओळखा गृहकर्ज काढताना जितका ईएमआय तुम्ही भरू शकता तितकेच कर्ज काढा. उगाच मोठा ईएमआय काढून इतर खर्च करताना ओढाताण होऊ शकते. बँका साधारणपणे कर्जदाराच्या हातात येणाऱ्या पगाराच्या ४० टक्केपर्यंत ईएमआयसाठी परवानगी देतात.
पहिले जिथून कर्ज घेतले; त्या बँकेत जा - ज्यांच्याकडे तुमचे आधीपासून चांगली ओळख आहे अशा बँकांकडून कर्ज घेणे अनेकदा फायद्याचे ठरते. यामुळे या बँका कर्जाची प्रक्रिया लवकर करतात. त्यांच्याकडे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर आणि वैयक्तिक तपशीलांबद्दल आधीच माहिती असते. यामुळेच अशा प्रकरणांमध्ये कमी वेळेत कर्ज दिले जाते.
स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँका...