नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 01:51 PM 2020-07-22T13:51:31+5:30 2020-07-22T15:07:28+5:30
तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असात तर नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंत खाली नमूद केलेल्या चुका करू नका.. कोरोनाच्या या संकटकाळात सध्या अनेकांच्या नोकऱ्या अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत नवी नोकरी शोधण्यासाठी अनेकांकडून धावपळ सुरू आहे. दरम्यान, नवी नोकरी शोधण्याच्या घाईगडबडीत अनेकदा काही चुका होतात, ज्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असात तर नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंत खाली नमूद केलेल्या चुका करू नका..
पात्रतेनुसार करा अर्ज नोकरी शोधण्याच्या घाईगडबडीमध्ये आपल्या पात्रतेला समकक्ष दिसणाऱ्या कुठल्याही पदांसाठी अर्ज केला जातो. त्यामुळे एचआरला तुमचा गोंधळ स्पष्टपणे दिसून येतो. मात्र तसे न करता तुमच्या पात्रतेनुसार योग्य पदासाठी अर्ज करा.
सीव्हीमधील चुका नोकरीसाठी अर्ज करताना तुमच्याकडून पाठवण्यात येत असलेला सीव्ही हा तुमची गुणवत्ता आणि क्षमतेचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे पाठवण्यत येत असलेला सीव्ही हा अधिकाधिक बिनचूक असणे आवश्यक असते. सीव्हीमध्ये असलेल्या चुकांमुळे समोरील व्यक्तीमध्ये तुमच्याबाबत नकारात्मकता निर्माण होऊ शकते.
प्रत्येक कंपनीला एकच कव्हर लेटर झटपट नोकरी मिळवण्याच्या गडबडीत बहुतांश लोक एक मोठी चूक करतात ती म्हणजे कव्हर लेटरची एकच कॉपी अनेक एम्प्लॉयरना पाठवतात. तसेच जर तुमच्या सीव्हीमधील मजकूर हा इंटरनेटवरील कुठल्यातरी फॉर्म्याटप्रमाणे असल्यासारखा दिसल्यास एम्प्लॉयर तुमच्याशी कधीही संपर्क साधणार नाही.
नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीवर फार अवलंबून राहू नका सध्या नोकरी शोधण्यासाठी अनेक ऑनलाइन पोर्टलचा वापर केला जातो. मात्र प्रत्येकवेळी नोकरीसाठी या ऑनलाइन पद्धतीवर अवलंबून राहू नका. त्यापेक्षा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती, मित्र परिवार आणि तुमच्या ओळखीच्या वर्तुळातील व्यक्तींची मदत घ्या.
वेळेचे नियोजन अनेकदा एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केल्यावर तिथल्या व्यवस्थापनाला आणि एचआरला फॉलोअपसाठी वारंवार फोन केले जातात, असे करणे चुकीचे आहे. वारंवार फॉलोअप घेतल्याने तुमच्याबाबत चुकीचे मत निर्माण होऊ शकते. त्यामुळे फॉलोअपसाठी योग्य वेळेची वाट पाहा.
मुलाखतीवेळी घ्या ही काळजी अनेकदा सर्व अडथळे पार करूनही नोकरीसाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे घोडे मुलाखतीच्या रिंगणात अडते. मुलाखतीला नेहमी वेळेआधी पोहोचा. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे द्या. तसेच चुकीची उत्तरे देऊ नका,
व्हर्च्युअल मुलाखत देताना अशी घ्या काळजी
नोकरीबाबत होमवर्क करणे विसरू नका सद्यस्थितीत अनेकांना आपण कोणत्या पद्धतीचा जॉब शोधला पाहिजे याचीच माहिती नसते. त्यामुळे तुम्ही ज्या कुठल्या नोकरीचा शोध घेऊ इच्छित असाल त्याबाबत आधीच माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच नोकरीसाठी अर्ज करतानाही योग्य ती माहिती घेऊनच करा. जर अर्धवट माहिती असेल आणि तुमची जॉबसाठी निवड झाली तरी अशी अर्धवट माहिती तुच्या फायनल सिलेक्शनमध्ये अडचण आणू शकते.