PAN Card हरवलंय?, नव्या वेबसाईटद्वारे 5 मिनिटांत डाऊनलोड करा e-PAN; पाहा संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:45 PM2021-06-15T17:45:40+5:302021-06-15T17:49:30+5:30

New Income Tax Department Website: सध्या पॅन कार्ड असणं हे खुप आवश्यक आहे. अनेक व्यवहारांसाठी कार्ड आवश्यक आहे.

आधार कार्डाप्रमाणेच (Aadhaar Card) पॅन कार्ड हेदेखील महत्त्वाचं आहे. बँक खातं उघडणं, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा अनेक गोष्टींसाठी पॅन कार्ड अतिशय आवश्यक असतं.

परंतु जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा ते तुम्हाला सापडत नसेल तर तुम्हाला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही.

तुम्ही सहजरित्या आपलं ई-पॅन कार्ड (e-Pan Card) इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकता.

सर्वप्रथम तुम्हाला incometax.gov.in या इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला Our Services वर क्लिक करावं लागेल.

त्यानंतर Instant E PAN वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या New E PAN या ऑप्शनवर क्लिक करा.

जर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर लक्षात नसेल तर तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर नियम अटी वाचून Accept वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो त्या ठिकाणी टाका. सर्व माहितीची पडताळणी करून Confirm या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर पीडीएफ फॉर्मेटमध्ये पॅन कार्ज मिळेल. त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

जर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक माहित नसेल तर तुम्हाला आधार कार्डानं पॅन डाऊनलोड करता येईल. परंतु यासाठी तुमंचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणं आवश्यक आहे.

जर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ई पॅन डाऊनलोड करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्यापूर्वी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे.