Mahindra कंपनीनं सुरू केली Oxygen On Wheels सेवा; महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:45 AM 2021-05-05T08:45:03+5:30 2021-05-05T08:53:07+5:30
Coronavirus Oxygen : सध्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची भासत आहे गरज. गेल्या काही दिवसांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता असल्याचंही दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर महिंद्रा लॉजिस्टिक्सनं (Mahindra Logistics) मंगळवारी ऑक्सिजन ऑन व्हिल्स (Oxygen On Wheels) सेवा सुरू केली.
ही एक मोफत सेवा आहे. यामुळे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांसोबत प्रोड्युसर्स कनेक्ट करण्यानं ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल.
सध्या महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
कंपनीनं परिवहन समस्या सोडवण्यासाठी १०० वाहनं सुरू केली असून आवश्यकतेनुसार सुरक्षित आणि लवकरात लवकर ऑक्सिजन डिलिव्हरी करतील.
सध्या महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्सद्वारे ही सेवा पुरवण्याचं काम केलं जात आहे.
"महिंद्रा लॉजिस्टिक्समार्फत ही सेवा पुरविली जाईल. जी या प्रकल्पावर प्रशासन आणि स्थानिक सरकारी घटकांशी करण्यात आलेल्या करारानुसार आहे," महिंद्रा अँड महिंद्राकडून सांगण्यात आलं.
दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता असून इतर शहरांमध्येही ही सेवा विस्तारित करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा करत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
गेल्या ४८ तासांतील उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता ऑक्सिजन सिलिंडर थेट रुग्णांच्या घरी पोहोचवण्याच्या या उपक्रमाचा विचार केला जात असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
"आपल्यासमोरील आव्हानं सोडविण्यासाठी त्यांची संसाधने व क्षमता नावीन्यपूर्ण ठेवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत," असं महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शहा म्हणाले.
ऑक्सिजन ऑन व्हील्स स्थानिक प्रशासनासोबत करार करून नागरिकांचं मोलाचं जीवन वाचवण्यासाठी आणि आरोग्य सेवेवरील दबाव कमी करण्यास मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सध्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात वाहनं असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
तसंच एका इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेटरसोबत महिंद्रा लॉजिस्टिक्स जीवन वाचवणारा ऑक्सिजन कोणत्याही व्यत्ययाशवाय आणि न संपणाऱ्या सप्लाय चेनवर काम करत आहे.
तो रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रांवर अशाप्रकारे पोहोचवला डाईल जे सुरक्षित आणि विश्वसनीय असेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.