सेलेरियो ते वॅगनआरपर्यंत, मारुतीच्या गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट; जाणून घ्या, कोणत्या गाडीवर किती सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 04:36 PM2022-07-17T16:36:29+5:302022-07-17T16:50:27+5:30

Maruti suzuki : मारुती सुझुकी एरिना आणि नेक्सा डीलरशिपच्या माध्यमाने आपल्या वाहनांवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे.

मारुती सुझुकी एरिना आणि नेक्सा डीलरशिपच्या माध्यमाने आपल्या वाहनांवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. हा डिस्काउंट कॅश, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात दिला जात आहे.

मारुती सुझुकी सेलेरियोवर 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

कंपनी वॅगन आरच्या 1.0-लीटर व्हेरिअंटवर 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

कंपनी वॅगन आर आणि स्विफ्टच्या 1.2-लीटर व्हेरिअंटवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि प्रत्येकी 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर केली जात आहे.

याच बरोबर, मारुती सुझुकी एस-प्रेसोवर 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

याशिवाय, आपण ऑल्टो 800 आणि ईकोवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकता.

मारुती सुझुकीच्या डिझायरवर 5,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयेची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. मात्र नवी ब्रेझा आणि अर्टिगावर कुठल्याही प्रकारची सूट नाही.

मारुतीकडून आपल्या नेक्सा रेन्जच्या माध्यमाने एस-क्रॉसवर 22,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

याच पद्धतीने इग्निसवर 23,000 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट ऑफर करत आहे.

याशिवाय, Ciaz वर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. मात्र, XL6 अथवा नव्या बलेनोवर कुठल्याही प्रकारची ऑफर नाही.