LIC Plan : दररोज 238 रुपये जमा केल्यास 54 लाखांची मिळेल मॅच्युरिटी; पाहा, काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:20 PM2022-07-17T19:20:24+5:302022-07-17T19:28:34+5:30

LIC Plan : या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी (Maturity) आणि डेथ बेनिफिट (Death Benefit) दोन्ही समाविष्ट आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वात विश्वसनीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाजवळ (Life Insurance Corporation of India) गुंतवणूकदारांसाठी एकापेक्षा जास्त प्लॅन आहेत.

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या जीवन लाभ स्कीमबद्दल सांगत आहोत. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटी (Maturity) आणि डेथ बेनिफिट (Death Benefit) दोन्ही समाविष्ट आहेत.

या पॉलिसी मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, मॅच्युरिटी रक्कम तुमच्या नॉमिनीला दिली जाईल. याशिवाय, जर पॉलिसी निर्धारित वेळेच्या शेवटपर्यंत टिकून राहिली आणि सर्व आवश्यक प्रीमियम भरल्यास त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून 'मॅच्युरिटी विमा निधी'च्या रूपात एकरकमी रक्कम मिळेल.

LIC च्या जीवन लाभ पॉलिसीमध्ये तुम्ही किमान 2 लाख रुपये गुंतवू शकता. गुंतवलेल्या कमाल रकमेवर मर्यादा नाही. या प्लॅनमध्ये मुदतपूर्तीसाठी वेगवेगळे कालावधी निश्चित करण्यात आले आहेत.

कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे 8 वर्षे ते 59 वर्षे मुदतीच्या कालावधीसाठी घेऊ शकते. प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे आहे. प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाईल.

या प्लॅनमध्ये अॅक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट रायडर (Accidental Death and Disability Benefit Rider), एलआयसीचे न्यू टर्म एश्योरेन्स राइडर (LIC's New Term Assurance Rider), एलआयसीचा न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट राइडर (LIC's New Critical Illness Benefit Rider), एलआयसीचा प्रीमियम वेव्हर बेनिफिट राइडर (LIC's Premium Waiver Benefit Rider), आणि काही मॅट्युरिटी बेनिफिटसाठी (Maturity Benefit) सेटलमेंट ऑप्शन प्लॅनद्वारे दिले जाणारे काही रायडर बेनिफिट्स आहेत.

या LIC प्लॅनसाठी तुमच्याकडे 4 पेमेंट पर्याय आहेत. मासिकसाठी किमान हप्त्याची रक्कम 5000 रुपये असेल. तिमाहीसाठी किमान हप्त्याची रक्कम 15,000 रुपये असेल आणि सहामाहीसाठी किमान हप्ता 25,000 रुपये असेल. तसेच, वार्षिक हप्त्याची रक्कम 50,000 रुपये असेल. या प्लॅनमध्ये हप्त्यांमध्ये मृत्यू लाभाचा दावा करण्याचा पर्याय देखील दिला जातो.

तुमचे वय 25 वर्षे असल्यास आणि तुम्हाला 25 वर्षे प्रीमियम भरण्याची मुदत निवडायची असेल. यामध्ये, तुम्हाला मूळ विमा रक्कम म्हणून 20 लाख रुपये निवडावे लागतील. GST वगळून 86954 रुपये प्रीमियम वार्षिक भरावा लागेल. हा दररोज जवळपास 238 रुपये असेल. तुम्ही 50 वर्षांचे व्हाल, तेव्हा 25 वर्षांनंतर एकूण मॅच्युरिटी जवळपास 54.50 लाख रुपये होईल.