मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज? By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:35 AM 2024-10-04T09:35:24+5:30 2024-10-04T09:47:35+5:30
या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. PM Internship Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात पीएम इंटर्नशिप योजनेची (PM Internship Scheme) घोषणा केली होती. यामध्ये पुढील ५ वर्षांत सुमारे १ कोटी तरुणांना याचा फायदा होईल.
या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. याशिवाय एका वर्षानंतर सरकारकडून एकरकमी ६००० रुपये स्वतंत्रपणे दिले जातील. यासाठी सरकारकडून अधिकृत वेबसाईट लाईव्ह करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया या योजनेसाठी कधी, कुठे, कसा अर्ज करायचा?
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता दिला जाईल. याशिवाय १ वर्षानंतर सरकारकडून एकरकमी ६००० रुपये स्वतंत्रपणे दिले जातील. ५००० रुपयांच्या या मासिक भत्त्यात १० टक्के म्हणजे ५०० रुपये कंपन्या त्यांच्या सीएसआर फंडातून आणि ४५०० रुपये सरकार कडून देण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात पीएम इंटर्नशिप योजनेची घोषणा केली होती, ज्यात पुढील ५ वर्षांत सुमारे १ कोटी तरुणांना याचा फायदा होईल. पहिल्या टप्प्यातील पहिल्या दोन वर्षांत ३० लाख युवकांना याचा लाभ घेता येणार आहे, तर पुढील ३ वर्षांत सुमारे ७० लाख तरुणांना यासोबत जोडलं जाईल.
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशातील जवळपास ५०० टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. या कंपन्या आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत या योजनेत १० टक्के मदत देऊन तरुणांना १ वर्षाचा कामाचा अनुभव देणार आहेत. २१ ते २४ वयोगटातील कोणताही तरुण ज्याच्याकडे दहावी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आहे तो पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू शकतो.
ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत आहे किंवा ज्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा तो स्वत: पूर्णवेळ नोकरीत आहे, अशी कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, आपल्याला प्रथम त्याच्या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल आणि एक फॉर्म भरावा लागेल, त्या ठिकाणी आपण आपल्या कौशल्य आणि आवडीबद्दल माहिती देऊ शकता. ज्यानंतर तुम्ही तुमच्या पात्रतेच्या आधारे इंटर्नशिप कुठे करू शकता हे ठरवलं जाईल.
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी आधार कार्ड, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक तपशील आणि पॅन कार्डसह काही महत्त्वाची कागदपत्रं आपल्याकडे तयार ठेवावी लागतील. पीएम इंटर्नशिप योजनेसाठी एक पोर्टल ३ ऑक्टोबरपासून लाईव्ह करण्यात आलंय. मात्र, अधिकृत उमेदवारांना १२ ऑक्टोबरपासून या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे.