'या' ५ म्युच्युअल फंडांनी ५ वर्षात दिला तीनपट परतावा! १० हजारांच्या SIP तून मिळाले १८ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:34 AM2024-10-02T10:34:31+5:302024-10-02T10:38:52+5:30

Mutual Fund : शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा पैसा वाहतो. या वाहत्या गंगेतून पैसे कमावण्यासाठी बाजाराचा अभ्यास असणे गरजेचं आहे. मात्र, ज्यांना ही जोखीम कमी करायची आहे, त्यांना म्युच्युअल फंडाहून बेस्ट पर्याय नाही. म्युच्युअल फंड एसआयपीची खरी मजा दीर्घ मुदतीतच येते. पैसा जितका जास्त काळ बाजारात राहील तितके जास्त नफा तयार होईल. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी गेल्या ५ वर्षांत एसआयपी गुंतवणुकीतून अडीच पटीने वाढ दिली आहे. यापैकी आम्ही तुम्हाला 5 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या ५ वर्षांत बंपर परतावा दिला आहे.

टाटा स्मॉल कॅप फंडाने गेल्या ५ वर्षात आपली SIP गुंतवणूक २.५१ पट वाढवली आहे. जर ५ वर्षांपूर्वी या योजनेत १०,००० रुपयांची एसआयपी केली गेली असती, तर आज त्याचे मूल्य ३७.८७ टक्के XIRR सह १५.०७ लाख रुपये झाले असते.

बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंडाने गेल्या ५ वर्षांत SIP गुंतवणुकीत २.५४ पट वाढ दिली आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाने गेल्या ५ वर्षांत SIP गुंतवणुकीत २.७३ पट वाढ केली आहे. या योजनेत, ५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०,००० रुपयांच्या SIP चे मूल्य आज ४१.४२% च्या XIRR सह १६.३५ लाख रुपये झाले असते.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने गेल्या ५ वर्षांत SIP गुंतवणुकीत २.७५ पट वाढ केली आहे. या योजनेत, ५ वर्षांपूर्वी १०,००० रुपयांच्या SIP चे मूल्य आज १६.५२ लाख रुपये झाले असते.

क्वांट स्मॉल कॅप फंडाने गेल्या ५ वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. या फंडाने SIP गुंतवणुकीत ३.१५ पट वाढ केली आहे. ५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत १० हजार गुंतवण्यास सुरुवात केली असती तर आज त्याचे १८.८९ लाख रुपये झाले असते.