money making tips axis bank fd rates hikes-by 5 bps on multiple tenors effective from 21 april
Axis बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! 'या' योजनेचे वाढवले दर, खातेधारक होणार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 08:13 PM2023-04-22T20:13:44+5:302023-04-22T20:20:47+5:30Join usJoin usNext Axis बँकेने ग्राहकांना खुशखबर दिली आहे. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस (Axis Bank) बँकेने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी दरांमध्ये ५ बेसिस पॉइंट्स (BPS) वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर २१ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत. अॅक्सिस (Axis) बँकेच्या ऑनलाइन एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान ५,००० रुपये जमा करावे लागतील. अॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ३.५० टक्के ते ७ टक्के व्याज देत आहे. बँक २ वर्ष ते ३० महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर सर्वाधिक ७.२० टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ७.९५ टक्के दराने व्याज मिळेल. ७ दिवस ते ४५ दिवसांतील एफडीवर ३.५० टक्के व्याजदर दिले जातील. बँक ४६ दिवस ते ६० दिवसात मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ४% व्याज देईल. ६१ दिवस ते ३ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ४.५० टक्के व्याजदर दिला जाईल. आता ३ महिने ते ६ महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.७५ टक्के व्याजदर दिला जाईल. अॅक्सिस बँक ६ महिने ते ९ महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ५.७५ टक्के व्याजदर देईल. ९ महिने ते १ वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ६% व्याजदर उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी RBI ने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात २.५० टक्क्यांनी वाढ केली होती.टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँकbankReserve Bank of India