Monthly Budget Calculation: पेट्रोल, डिझेल महाग होणारेय... गृहीणींने या चार गोष्टींवर खर्च टाळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:37 AM2022-03-07T09:37:38+5:302022-03-07T09:47:15+5:30

how to cut monthly expense in home: रिकरिंग खर्चावर नियंत्रण म्हणजेच आर्थिक समृद्धीस आमंत्रण, हे नेहमी लक्षात ठेवा.

दैनंदिन जीवनात वारंवार येणारे खर्च म्हणजेच रिकरिंग कॉस्ट. हा खर्च दररोज, आठवडा किंवा महिन्यातून येणारा; परंतु वारंवार असतो. या खर्चावर नियंत्रण नसेल तर भविष्यात मोठी आर्थिक कुचंबणा होऊ शकते.

१. वाहतूक (पेट्रोल) खर्च - इंधनाचे दर वाढते राहणार आहेत. दुचाकीसाठी रोजच्या इंधनाच्या खर्चाची रक्कम किती हे पाहून इलेक्ट्रिक बाइक घेण्याचा विचार करता येईल.

२. इंटरनेट - रोटी, कपडा, मकान आणि आता इंटरनेट डेटा हा चौथा घटक दैनंदिन जीवनात महत्त्वाचा आहे. जितका आवश्यक प्लॅन तितकाच घ्या व प्रत्येक महिन्यात येणारी बिलं रक्कम कमी करा.

३. केबल / डिश - गेल्या महिन्यात किती चॅनल वारंवार पहिले याचा आढावा घ्या. जितके आवश्यक तितकेच चॅनल ठेवा आणि अतिरिक्त खर्च टाळा.

४. विद्युतबिल - दर महिन्यात येणारे विद्युतबिल कमी करता करता येते. इलेक्ट्रिक गिझरऐवजी गॅस गिझर, ४/५ स्टार इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर, कमी वॅटेजचे बल्ब्स यातून विद्युतचा वापर कमी होतो आणि बिल कमी येते.

असे विविध वारंवार येणारे खर्च नेमके कोणते याची यादी करा व त्यात बचत कशी करता येईल, याचा विचार अवश्य करा. हे कायम लक्षात ठेवा की रिकरिंग खर्चावर नियंत्रण म्हणजेच आर्थिक समृद्धीस आमंत्रण.

टॅग्स :पैसाMONEY