'या' सरकारी स्कीममध्ये मिळू शकते ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम, केवळ 'इतक्या' गुंतवणूकीत होईल काम
By जयदीप दाभोळकर | Updated: April 12, 2025 09:08 IST2025-04-12T08:46:45+5:302025-04-12T09:08:17+5:30
NPS Retirement investment plan: निवृत्तीच्या वेळी आपल्याकडे मोठा फंड असावा असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु यासाठी योग्य नियोजन हवं. हो, जर तुम्हाला निवृत्तीनंतर ३ कोटी रुपयांचा मजबूत निधी तयार करायचा असेल तर एक सरकारी स्कीम तुम्हाला मदत करू शकते.

NPS Retirement investment plan: निवृत्तीच्या वेळी आपल्याकडे मोठा फंड असावा असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु यासाठी योग्य नियोजन हवं. हो, जर तुम्हाला निवृत्तीनंतर ३ कोटी रुपयांचा मजबूत निधी तयार करायचा असेल, तर नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुमचं वय ३५ वर्षे असेल, तर २०,००० रुपये गुंतवून तुम्ही निवृत्तीपर्यंत ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. तर मग आपण समजून घेऊया की कसा यात तुम्ही ३ कोटींपर्यंतचा निधी उभारू शकता.
निवृत्तीच्या वेळी प्रत्येकाला चांगल्या फंडाची गरज असते, परंतु हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरवात कराल. यासाठी एनपीएस हा पर्याय चांगला ठरू शकतो. जर तुमचं वय ३५ वर्षे असेल तर तुम्ही एनपीएसच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम गुंतवल्यास सरासरी ९-१२% परताव्याची अपेक्षा करू शकता. या गुंतवणूकीवर पुढील २० वर्षांत ३ कोटींपेक्षा अधिकची रक्कम उभी करू शकता.
निवृत्तीनंतर पैशाची चिंता टाळण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, शिस्त आणि गुंतवणुकीत दीर्घकाळ टिकून राहणं गरजेचं आहे. जर तुमचं वय ३५ वर्षे असेल तर आर्थिक स्वातंत्र्याचं नियोजन करून पुढील २० वर्षांत ३ कोटी रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकतो. या फंडासाठी तुम्हाला सर्वप्रथम एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू करावी लागेल.
जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल आणि पगारातून एम्प्लॉयर-एम्प्लॉई स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर ते पगाराच्या १०% आणि नियोक्ताचे १४% योगदान असतं. म्हणजे एकूणच ही गुंतवणूक तुमच्या रिटायरमेंट फंडात दर महिन्याला चांगली रक्कम जोडली जाते. याशिवाय जर तुम्ही दरमहा एनपीएसमध्ये स्वतंत्रपणे २०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी एक चांगली रक्कम मिळू शकते.
एनपीएसमध्ये तुम्हाला सरासरी ९ ते १२ टक्के वार्षिक परतावा सहज मिळू शकतो. जर तुमचं वय ३५ वर्षे असेल तर तुम्ही एनपीएसमध्ये २०,००० रुपयांची गुंतवणूक करू शकता आणि २० वर्षात ३ कोटींपेक्षा जास्त फंड तयार करू शकता. एनपीएसमध्ये तुम्हाला मिळणारा रिटर्न हा कमी जास्त होऊ शकतो, म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी परताव्याची माहिती घेतली पाहिजे.
जर तुम्ही एनपीएसमध्ये दरमहा २०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला सरासरी ९ टक्के वार्षिक परतावा मिळेल अशी अपेक्षा करू. जर तुम्ही ही गुंतवणूक २० वर्षे चालू ठेवली तर तुम्ही ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. तुमची २० वर्षांची गुंतवणूक ९६,००,००० रुपये असेल. यामध्ये तुम्हाला ८,४०,२६,४०५ रुपये व्याजद्वारे परतावा मिळेल आणि मॅच्युरिटी रक्कम ९,३६,२६,४०५ रुपये असेल. सर्व काही जोडल्यास एकूण रक्कम ३,७४,५०,५६२ रुपये होईल.
एनपीएसमध्ये जास्त अॅन्युईटी ठेवल्यानं मासिक पेन्शन देखील वाढू शकतं, ज्यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर एक निश्चित आणि स्थिर रक्कम मिळेल. तसं, गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही NPS कॅल्क्युलेटरच्या मदतीनं पेन्शन आणि फंड वाढ सहजपणे समजून घेऊ शकता. तुम्हाला ६०% रक्कम काढल्यावर कर भरावा लागू शकतो आणि ४०% रक्कम अॅन्युइटीमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. चक्रवाढ व्याजदरानं तुम्ही हा निधी वेगानं वाढवू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)