मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल... By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 08:39 PM 2024-09-22T20:39:35+5:30 2024-09-22T20:45:47+5:30
Mukesh Ambani New Private Jet : हे विमान मिळवणारे मुकेश अंबानी जगातील पहिलेच उद्योगपती आहेत. Mukesh Ambani New Private Jet : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) दररोज कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. यावर्षी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नामुळे संपूर्ण अंबानी कुटुंब खूप चर्चेत राहिले.
आता मुकेश अंबानी यांची पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चा सुरू झाली आहे. आता चर्चेत येण्याचे कारण अंबानी कुटुंबाचे नवीन खाजगी जेट बोइंग 737 मॅक्स 9 आहे. हे भारतातील पहिले अल्ट्रा लक्झरी खाजगी जेट असून, याची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, अंबानी कुटुंबाच्या नवीन लक्झरी प्रायव्हेट जेट बोइंग 737 मॅक्स 9 ची किंमत सुमारे 1000 कोटी रुपये आहे. आतापर्यंत भारतात कोणाकडेही हे विमान नाही. भारतात या विमानाची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती.
अखेर हे महागडे खासगी जेट ऑगस्टमध्ये भारतीय भूमीवर दाखल झाले. भारतात आणण्यापूर्वी त्याची बासेल, जिनिव्हा आणि लंडनमध्ये चाचणी करण्यात आली. अंबानी कुटुंबाने त्यांच्या गरजेनुसार त्यात बरेच कस्टमायझेशन केले आहे.
जगातील कोणत्याही उद्योगपतीकडे बोईंग 737 मॅक्स 9 नाही. म्हणजेच, हे विमान मिळवणारे मुकेश अंबानी जगातील पहिले उद्योगपती आहेत. हे विमान त्याच्या प्रशस्त केबिन आणि मोठ्या मालवाहू जागेसाठी ओळखले जाते.
या विमानात दोन CFMI LEAP-1B इंजिन मिळते. MSN 8401 क्रमांक असलेले हे लक्झरी प्रायव्हेट जेट एकावेळी 11,770 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. आराम, वेग आणि लक्झरी यांचा कॉम्बो असलेल्या Boeing 737 Max 9 ला आकाशात उडणारे 7 स्टार हॉटेल म्हणतात.
महत्वाची बाब म्हणजे, अंबानी कुटुंबाकडे बोईंग 737 MAX 9 व्यतिरिक्त स्वतःच्या मालकीचे आणखी 9 लक्झरी खाजगी जेट आहेत. यामध्ये Bombardier Global 6000 आणि Embraer ERJ-135 तसेच दोन Dassault Falcon 900 यांचा समावेश आहे. 9 लाख कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा एक आलिशान कारदेखील आहेत.