मुकेश अंबानींनी ५९२ कोटींना खरेदी केलं ब्रिटनमधील आयकॉनिक स्टोक पार्क; पाहा काय आहे विशेष By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:56 PM 2021-04-23T17:56:25+5:30 2021-04-23T18:03:55+5:30
Mukesh Ambani Buys Stoke Park: रिलायन्स इंडस्ट्रीजनं तब्बल ५९२ कोटी रूपयांना ब्रिटनमधील आयकॉनिक कंट्री क्लब आणि लग्झरी गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कची खरेदी केली. दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं ५७ दशलक्ष पौंड्स म्हणजेच जवळपास ५९२ कोटी रूपयांना ब्रिटनच्या आयकॉनिक कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट पार्कची खरेदी केली.
गेल्या चार वर्षांमध्ये कंपनीनं केलेल्या ३३० कोटी रूपयांच्या अधिग्रहणाची माहिती कंपनीकडून देण्यात आली.
यामध्ये रिटेल सेक्टरमध्ये १४ टक्के, तंत्रज्ञान तसंच मीडिया आणि टेलिकॉम क्षेत्रात ८० टक्के आणि ऊर्जा क्षेत्रात ६ टक्के अधिग्रहणाचा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इनव्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेडनं (आरआयआयएचएल) हे अधिग्रहण केलं.
२२ एप्रिल रोजी कंपनीनं युनायटेड किंगडम येथील स्टोक पार्क लिमिटेडचं ५७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५९२ कोटी रूपयांना अधिग्रहण केल्याची माहिती कंपनीनं दिली.
स्टोक पार्क लिमिटेड बर्किंघमशायरच्या स्टोक पार्क पोझेझमध्ये स्पोर्टिंग आणि लिझर फॅसिलिटी ओन आणि मॅनज करतं.
स्टोक पार्कमध्ये लक्झरी स्पा, हॉटेल, गोल्फ कोर्स आणि कंट्री क्लब आहेत. स्टोक पार्क एकूण ३०० एकर जागेत पसरलेलं आहे.
सुविधांमध्ये एक हॉटेल, कॉन्फरन्स सनविधा, खेळाच्या सुविधा आणि युरोपमध्ये हाय रेटेड गोल्फ कोर्सचा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे की आता आरआयआयएचएलने या हेरिटेज साइटवर खेळ व विश्रांतीसाठीच्या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याची योजना आखली आहे, जे स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करुन केलं जाईल.
हे अधिग्रहण रिलायन्सला कंझ्युमर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवण्यासाठी मदत करेल.
पाइनवुड स्टुडिओ आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीत स्टोक पार्कचा नेहमीच जवळचा संबंध आहे.
जेम्स बाँडचे दोन चित्रपट गोल्डफिंगर आणि टुमारो नेव्हर डाईज या चित्रपटांचं चित्रिकरण स्टोक पार्कमध्येच करण्यात आलं आहे.
पार्कनं आपल्या वेबसाईटवर नमूद केलं की जेम्स बाँड (शॉन कॉनरी) आणि गोल्ड फिंगर (गर्ट फ्रोब) यांच्यातील एपिक ड्युअल आताही चित्रपटांच्या इतिहासात गोल्फचा सर्वात प्रसिद्ध खेळ मानला जातो.
३०० एकर परिसरात पसरलेल्या पार्कलँडमध्ये Bridget Jones's Diary च्या काही दृश्यांचं चित्रिकरणही या ठिकाणी झालं होतं.
ब्रिटनची किंग फॅमिली अनेक वर्षांपासून याच्या विक्रीचा प्रयत्न करत होती. त्यांनी २०१८ मध्ये याच्या विक्रीची शक्यता पडताळण्यासाठी CBRE जारी केला होता.