Mukesh Ambani tops list of world top 10 richest; See how much wealth?
जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींचं नाव झळकलं; पाहा किती आहे संपत्ती? By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 09:08 PM2020-06-20T21:08:39+5:302020-06-20T21:13:49+5:30Join usJoin usNext फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्ज अब्जाधीश क्रमवारी जाहीर झाली आहे यात भारताच्या मुकेश अंबानींचा टॉप १० मध्ये समावेश झाला आहे. यात मालमत्तेचे मूल्यांकन शेअर्सच्या किंमतीच्या आधारे केले जाते आणि दर पाच मिनिटांत ते अपडेट केले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानीचा वाटा ४२ टक्के आहे. रिलायन्स ही देशातील पहिली ११ लाख कोटींची मार्केट कॅप कंपनी आहे. फोर्ब्सच्या या यादीमध्ये अँमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १६०.२ अब्ज डॉलर्स आहे. कोरोना लॉकडाऊननंतर ई-कॉमर्स बाजार तेजीत आहे. बरेच लोक ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतात. दुसर्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत आणि त्यांची संपत्ती १०९.३ अब्ज डॉलर्स आहे. हे दोन्ही व्यवसाय अमेरिकेचे आहेत. या यादीत तिसरा क्रमांक बर्नार्ड अर्नाल्ट व कुटुंब आहे. त्यांची एकूण मालमत्ता १०३.२ अब्ज डॉलर्स आहे. ते फ्रान्सचे आहेत. चौथ्या क्रमांकावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे. त्यांची एकूण मालमत्ता ८७.८ अब्ज डॉलर्स आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकने ९.९९% हिस्सेदारी सुमारे ४४ हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. तेव्हापासून जिओमध्ये गुंतवणूकदारांची रांग लागली आहे पाचव्या क्रमांकावर बर्कशायर हॅथवेचा प्रमुख वॉरेन बफे आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७१.२ अब्ज डॉलर्स आहे. बुफे हे जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. कोरोनाचा प्रभाव प्रत्येक उद्योगावर होता, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य कमी झाले आहे. सहाव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बाल्मर आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ६९.४ अब्ज डॉलर्स आहे. सातव्या क्रमांकावर, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 67.9 अब्ज डॉलर्स आहे. आठव्या क्रमांकावर स्पेनचा अमानसीओ ऑर्टेगा आहे. त्यांची एकूण मालमत्ता 65.8 अब्ज डॉलर्स आहे. ते कपड्यांच्या ब्रँड झाराचा मालक आहेत. ६४.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. मार्च २०२१ पर्यंत त्यांनी कंपनीला कर्जमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्याआधी ही कंपनी निव्वळ कर्जमुक्त झाली. फोर्ब्सच्या यादीत दहाव्या क्रमांकावर गुगलचे लॅरी पेज आहे. त्यांची एकूण मालमत्ता ६४.५ अब्ज डॉलर्स आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये भारताचे दुसरे श्रीमंत डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी आहेत. ग्लोबल लिस्टमध्ये त्यांचा क्रमांक ८४ आहे. त्यांच्या एकूण मालमत्ता १६.२ अब्ज डॉलर्स आहे. टॅग्स :मुकेश अंबानीफोर्ब्सगुगलफेसबुकMukesh AmbaniForbesgoogleFacebook