Mukesh Ambani vs Gautam Adani: मुकेश अंबानींना जे झेपले नाही, ते अदानी करणार! सौदीच्या बड्या कंपनीला आपल्या जाळ्यात खेचणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 09:17 AM 2022-03-19T09:17:36+5:30 2022-03-19T09:23:37+5:30
Gautam Adani Group Dealing with saudi aramco: अदानींनी सौदीच्या या बड्या कंपनीला अशी ऑफर दिली आहे की, ती विन विन सिच्युएशन असेल. सौदीच्या उपकंपन्यांनाही भारतात संधी देणार. आशियातील दोन नंबरचे श्रीमंत व्यक्ती बनलेले गौतम अदानी आता पहिल्या क्रमांकावरील मुकेश अंबानींना सर्वच बाबतीच कडवी टक्कर देऊ लागले आहेत. अंबानींना जे दोन वर्षे प्रयत्न करून जमले नाही ते अदानी करून दाखविणार आहेत. सौदीची जगप्रसिद्ध तेल कंपनी सौदी अरामकोला आपल्या जाळ्यात ओढणार आहेत.
सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक, निर्यातदार कंपनी आहे. ही कंपनी भारतात येत होती. यासाठी तिला भारतातील पार्टनर हवा होता. मुकेश अंबानींची रिलायन्स सौदीच्या कंपनीशी हातमिळवणी करत होती, दोन वर्षे त्यावर चर्चाही झाली, परंतू गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये काहीतरी बिनसले आणि हा सौदा झाला नाही.
आता ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अदानी ग्रुप आता या डीलमध्ये उतरला आहे. अदानी ग्रुप सौदीसोबत पार्टनरशीपच्या संधी शोधत आहे. यामध्ये सौदीच्या या कंपनीत हिस्सा खरेदी देखील सहभागी आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत अरामकोमध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इनवेस्टमेंट फंड (Public Investment Fund) ची हिस्सेदारी देखील खरेदी करण्यावर चर्चा झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अदानी सध्या अरामकोचे शेअर खरेदी करण्यासाठी करोडो डॉलर्स खर्च करणार नाहीत. मात्र, कंपनीत ते मोठ्या प्रमाणावर सहकार्यावर भर देऊ शकतात.
अदानी ग्रुप अरामकोच्या उपकंपन्यांमध्ये देखील प्रवेश करू शकतो. सेबिक सारख्या या कंपन्या रिन्यूएबल एनर्जी, क्रॉप न्यूट्रियंट्स आणि केमिकल्ससारख्या क्षेत्रात आहेत. या कंपन्यांशी अदानी हात मिळवू शकतात. ही अरामकोसाठी विन विन डील असेल.
याशिवाय अदानी सौदीच्या सॉवरेन वेल्थ फंड पीआईएफला भारतीय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देऊ शकतात.
या डीलमधील माहितगारांनुसार दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे, ती सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अदानी ग्रुपने देखील यावर काही अंतिम निर्णय घेतलेला नाही. याचबरोबर या विषयावर अदानी ग्रुपच्या प्रतिनिधींनी काही टिप्पणी केलेली नाही. अरामकोच्या प्रवक्त्यांनी देखील यावर बोलण्यास नकार दिला आहे.
गौतम अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. Bloomberg Billionaires Index नुसार त्यांची संपत्ती 90.5 अब्ज डॉलर आहे.