mukesh Ambani's daughter in law and akash ambani's would be wife shloka mehta's photos
पाहा फोटो : अंबानींची 'ही' भावी सुन आहे कायदेविषयाची पदवीधर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:35 PM2018-03-27T17:35:18+5:302018-03-27T17:46:08+5:30Join usJoin usNext मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा नुकताच साखरपुडा झाला. प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आणि आकाशची लहानपणापासूनची मैत्रीण श्लोका मेहताशी त्याची लवकरच लगीनगाठ बांधली जाणार आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये असल्यापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात. श्लोकाने कायदेविषयातलं आपलं पदव्युत्तर शिक्षण लंडन व अमेरिकेत पूर्ण केलं आहे. तीसुद्धा एक उत्तम व्यावसायिक असून मनमिळाऊ मुलगी आहे. गाणी ऐकणं आणि भटकंती हे तिचे आवडते छंद. यापूर्वी अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसलेत. आता अंबानींची सून म्हणजे तितकीच स्मार्ट असणार, नाही का! अंबानींच्या घरचं लग्न म्हणजे थाटसुद्धा तितकाच शाही असणार इतकं नक्की.टॅग्स :आकाश अंबानीमुकेश अंबानीव्यवसायAkash AmbaniMukesh Ambanibusiness