Mukesh Ambani: अंबानींची दिवाळी खरेदी जोरात, दोन Rolls Royce आल्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:03 PM2022-10-16T12:03:35+5:302022-10-16T12:12:35+5:30

देशात दिवाळीची लगबग सुरू असून सर्वत्र खरेदीची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यत दिवाळीसाठी काही ना काही खरेदी करण्याचा विचार करत आहे. कुणी कपडे, सोने, दुचाकी, कार, घर खरेदी करताना दिसून येतात. मात्र, देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती अंबानी यांनी कोट्यवधींची खरेदी केली आहे.

देशात दिवाळीची लगबग सुरू असून सर्वत्र खरेदीची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यत दिवाळीसाठी काही ना काही खरेदी करण्याचा विचार करत आहे. कुणी कपडे, सोने, दुचाकी, कार, घर खरेदी करताना दिसून येतात. मात्र, देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती अंबानी यांनी कोट्यवधींची खरेदी केली आहे.

देशातले दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाकडे अनेक लग्झरी कार्स आहेत. त्यामध्ये आता दोन नवीन आलिशान कार्सची भर पडली आहे. दिवाळी येताच अंबानी कुटुंबियांनी आपल्या कार कलेक्शनमध्ये दोन नवीन रोल्स रॉयस कार्स वाढवल्या आहेत.

अंबानींच्या या कारपैकी एक कार अहमदाबाद येथे तर दुसरी कार मुंबईत ठेवली आहे. हे रोल्स रॉयसचे फँटम मॉडेल्स आहेत. एका पेजद्वारे याबाबतची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्या नवीन रोल्स रॉयस कारचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

अंबानींची ही कार डुअल टोन कलरमध्ये येते. ज्यामध्ये ज्युबली सिल्व्हर आणि बोहेमियन रेडचा देखील समावेश आहे. दुसरी फँटम कार मुंबईत ठेवली आहे. ही कार मूनस्टोन पर्ल रंगाची आहे. या कारचा नंबरही हटके ९४९५ असा आहे

अंबानी कुटुंबियांकडे आधीपासूनच मुंबईत रोल्स रॉयस फँटम ईडब्ल्यूबी कार उपलब्ध आहे. या कारची किंमत १३.५ कोटी रपये इतकी आहे. परंतु ही किंमत कस्टमायजेशनच्या आधीची आहे. कस्टमायजेशननंतर ही किंमत याहून जास्त असेल.

न्यू जनरेशन रोल्स रॉयस फँटम कार अॅल्युमिनियम स्पेकफ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत ३० टक्के हलकी आहे.

जुन्या मॉडेलच्या तुलनेत ७७ मिमी लहान, ८ मिमी लांब आणि २९ मिमी रुंद आहे. यामध्ये २४ स्लॅटवालं ग्रिल, एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी प्रोजेक्ट हेडलाईट देण्यात आली आहे.

या कारमध्ये ६.७५ लीटर ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही १२ इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १७०० आरपीएमवर ५६३ बीएचपी पॉवर आणि ९०० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. कंपनीने फँटम ८ च्या इंजिनला ८ स्पीड सॅटेलाइट-अॅडेड ट्रान्समिशनसह सुसज्ज बनवल आहे.

ही लग्झरी कार ५.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण करू शकते. या कारचा टॉप स्पीड २५० किमी प्रति तास इतका आहे.

अंबानी हे कारचे मोठे शौकीन आहेत, त्यामुळे ते सणानिमित्त किंवा घरातील शुभ कार्यावेळी अशा लग्झरी कार्सची खरेदी करत असतात