Reliance Jio च्या 'या' प्लॅनसोबत मिळतोय २०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३ सिम; लवकर घ्या फायदा By जयदीप दाभोळकर | Published: February 14, 2021 03:16 PM 2021-02-14T15:16:50+5:30 2021-02-14T15:21:26+5:30
Reliance Jio : कंपनी देतेय डेटासोबतच अतिरिक्त सिमकार्ड आणि अनेक सुविधा, पाहा काय आहे विशेष दूरसंचार क्षेत्रात वाढत असलेल्या या कॉम्पिटिशनच्या जमान्यात सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स देत आहेत.
रिलायन्स जिओनं गेल्या काही महिन्यांमध्ये युझर्समध्ये आपली एक ओळख तयार केली आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन सादर केले आहेत. यापैकी अनेक प्लॅन्समध्ये ग्राहकांना डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंगसारख्या सुविधा देण्यात येत आहेत.
कंपनी सध्या फॅमिली प्लॅनही देत आहे. यामध्ये डेटासोबतच अतिरिक्त सीमही देण्यात येत आहेत.
रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७५ जीबी डेटा देण्यात येत आहे. यामध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात येते. यामध्ये ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी ५९९ रूपयांचा एक पोस्टपेड प्लॅनही आणला आहे. या प्लॅनची वैधता एक बिलिंग सायकल आहे. यामध्ये १०० जीबी डेटा ऑफर करण्यात येतो. तसंच डेटा संपल्यानंतर ग्राहकांना १० रुपये प्रति जीबी या दरानं डेटा देण्यात येतो.
याव्यतिरिक्त ५९९ रूपयांच्या या प्लॅनसोबत २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही आहे. फॅमिली प्लॅन अंतर्गत यासोबत अतिरिक्त एक सिमकार्ड देण्यात येतं. यामध्ये १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते.
कंपनीनं ७९९ रूपयांचाही एक पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना १५० जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यात २०० जीबीपर्यंड डेटा रोलओव्हर करू शकता.
७९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त २ सिमकार्ड देण्यात येतात. याव्यतिरिक्त यात अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएसची सुविधाही देण्यात येते.
रिलायन्स जिओनं आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ९९९ रूपयांचाही एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये एकूण २०० जीबी डेटा मिळतो. तसंच यामध्ये ५०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही देण्यात आली आहे.
९९९ रूपयांचा हा प्लॅन एक फॅमिली प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना अतिरिक्त ३ सीमकार्ड घेता येऊ शकतात. याशिवाय या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात येते.