Multibagger Share Stock Market : ७० रुपयांचा शेअर पोहोचला २७०० पार, गुंतवणूकदार मालामाल; कंपनी देतेय ५७० टक्के डिविडेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:09 PM2022-04-27T12:09:55+5:302022-04-27T12:21:30+5:30

इंडस्ट्रियल मशीनरीशी निगडीत एका कंपनीनं गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देत मालामाल केलं. तुमच्याकडे आहे का शेअर?

कंपनीनं आता ५७० टक्के म्हणजेच ५७ रुपयांचा फायनल डिविडेंड देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं डिविडेंटसाठी एक्स डेट २८ एप्रिल २०२२ निश्चित केलीये. तर रेकॉर्ड डेट ३० एप्रिल २०२२ असणार आहे.

एक ने OLA स्कूटर से परेशान होकर उसमें लगा दी आग लगाई, दूसरे ने गधे के साथ घुमाया; पढें पूरी खबर

१४ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर (BSE) टोव्हेक इंडस्ट्रीजचे शेअर्स ७० रुपयांच्या पातळीवर होते. २६ एप्रिल २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर २८४२.३५ वर बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनं ३८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने १४ नोव्हेंबर २००८ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आजच्या घडीला या पैशांचं मूल्य आज ४०.६० लाख रूपये झालं असतं.

६ ऑगस्ट १९९८ रोजी स्टोवेक इंडस्ट्रीचे शेअर बीएसईवर १८ रुपयांवर होते. २६ एप्रिल २०२२ रोजी कंपनीचे शेअर बीएसईवर २८४२.३५ रुपयांच्या स्तरावर बंद झाले.

जर एखाद्या गुंतवणूकदारानं ६ ऑगस्च १९९८ रोजी कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती तर त्याचं मूल्य आज १.५७ कोटी रूपये असतं.

कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची निचांकी पातळी १७६६ रुपये होती. तर कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २९४९ रुपये होती.