Multibagger Stock: ३६ पैशांचा शेअर पोहोचला १६०० पार; १० हजारांचे झाले ४ कोटी; गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:36 AM2022-03-15T10:36:52+5:302022-03-15T11:19:06+5:30

Multibagger Stock: जर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला संयमही बाळगणं आवश्यक आहे.

Multibagger Stock: जर तुम्ही शेअर बाजारातून (Stock Market) कमाईच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला संयमही बाळगणं आवश्यक आहे. शेअर बाजारातील दिग्गजांच्या मते, केवळ शेअर्स खरेदी-विक्री करून पैसा कमावला जात नाही, तर त्यासाठी संयमही तितकाच महत्त्वाचा आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणे खरेदी करा, होल्ड करा आणि विसरुन जा. गुजरातच्या ज्योती रेझिन्स आणि अॅडेसिव्ह्ज लिमिटेड (Jyoti Resins and Adhesives Ltd) या कंपनी ग्राहकांना मालामाल केलं आहे. कंपनीच्या शेअर्सनं छप्परफाड रिटर्न्स देत ग्राहकांना आश्चर्यचकित केलं आहे. कंपनीच्या स्टॉकने जवळपास १८ वर्षांत ४,५४,९०० टक्क्यांहून अधिक परतावा (Stock Return) दिला आहे.

३० एप्रिल २००४ रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर (BSE) ज्योती रेझिन्स आणि अॅडेसिव्ह्ज लिमिटेड (Jyoti Resins & Adhesives Ltd share price) चे शेअर्स ३६ पैसे प्रति शेअर या पातळीवर होते. आता कंपनीचे शेअर्स (११ मार्च रोजी) १,६३८.५५ रुपयांवर पोहोचले.

या दीर्घ कालावधीत शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना ४,५४,९०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या १० वर्षांत, कंपनीचे शेअर्स ९.३२ रुपयांवरून (१६ मार्च २०१२) १,६३८.५५ रुपयांवर पोहोचले. म्हणजेच दहा वर्षांत या शेअरनं सुमारे १,७४७५.११ टक्के इतका परतावा दिला आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये हा शेअर ६९ रुपयांवरून (१८ डिसेंबर २०१७) वाढून १,६३८.५५ रूपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान, या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना २२७३.९१ टक्क्यांचा परतावा दिलाय. वर्षभरापूर्वी १५ मार्च २०२१ रोजी या शेअरची किंमत ४८०.१० रुपये होती. एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये २४१.२९ टक्क्यांची वाढ झाली.

२०२२ मध्ये या शेअरमध्ये ४६.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर महिन्याभरात कंपनीच्या शेअरमध्ये २०.१२ टक्क्यांची वाढ झाली. परंतु गेल्या पाच सत्रांमध्ये या शेअरमध्ये विक्रीही दिसून आली.

या शेअरची वाढ पाहिली तर, जर एखाद्या व्यक्तीनं १८ वर्षांपूर्वी ३६ पैशांप्रमाणे यात १० हजार रुपये गुंतवले असतील, तर त्याचं मूल्य ४.५५ कोटी रूपये झालं असतं. तर दुसरीकडे एखाद्या व्यक्तीनं ९,३२ रुपयांप्रमाणे १० हजार रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज १७.५८ लाख रूपये असतं. तर वर्षभरापूर्वी यात पैसे गुंतवले असते, तर १० हजार रूपयांचं मूल्य आज ३४.१२ हजार रुपये असतं.

या कंपनीची स्थापना १७ डिसेंबर १९९३ रोजी झाली होती. २२ फेब्रुवारी १९९४ रोजी कंपनीनं व्यवसाय सुरू केला होती. ही कंपनी गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. या कंपनीचं मार्केट कॅप ६५५.४३ कोटी रूपये आहे.