4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 09:31 PM 2022-03-20T21:31:37+5:30 2022-03-20T21:40:46+5:30
आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे. आपण या वर्षीच्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर (Multibagger stock list) ही बातमी आपल्यासाठी फायद्याची असू शकते. आज आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे.
1. SEL Manufacturing - SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 44.40 रुपये (BSE वर 3 जानेवारी 2022) वरून 529.55 रुपयांवर गेला आहे. SEL मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकने या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 1,092.68 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.
या शेअरने 2022 च्या आतापर्यंतच्या 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना हजार टक्क्यांहून अधिकचा फायदा मिळवून दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 11.92 लाख रुपये झाली असती.
2. Sezal Glass - सेझल ग्लासचा शेअर 25.50 रुपयांवरून (एनएसईवर 3 जनवरी 2022) आता 287.40 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 1,027.06% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 11.27 लाख रुपये झाले असते.
3. Kaiser Corporation - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर 2.92 रुपयांवरून (NSE 3 जानेवारी 2022 रोजी) 33.70 रुपयांवर पोहोचला आहे. या पॅकेजिंग मल्टीबॅगर स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,054.11% चा जबरदस्त परतावा दिला आहे. या वर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम 11.54 लाख रुपये झाली असती.
4. Shanti Educational - शांती एज्युकेशनलचे शेअर्स 99.95 (BSE वर 3 जानेवारी 2022) वरून रु. 867.80 वर पोहोचले आहेत. या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 768.23% चा जबरदस्त परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये यावर्षी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे 8.68 लाख रुपये झाले असते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)