Multibagger Share : टाटाच्या ‘या’ शेअरनं दिले ३९०० टक्के रिटर्न, १ लाखांचे झाले ४० लाख; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 07:43 PM2022-12-02T19:43:58+5:302022-12-02T19:48:07+5:30

Multibagger Share : ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करून वेट अँड वाचची भूमिका घेतली त्यांना या शेअरनं उत्तम परतावा दिला आहे.

Multibagger Share : गेल्या काही वर्षांत, टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड किंवा टीटीएमएलच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जानेवारी 2022 मध्ये स्टॉकने सर्वकालीन उच्चांक देखील पाहिला. जानेवारी 2022 मध्ये, स्टॉक प्रति शेअर 290.15 ₹ च्या पातळीवर गेला होता.

मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीनंतर यात घसरणही दिसून आली होती. परंतु ज्या गुंतवणूकदारांनी वाट पाहिली त्यांना या शेअरनं उत्तम परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हा शेअर जवळपास 2.50 रुपयांवरून 100 रुपयांच्या पार गेला आहे. हे तब्बल 3900 टक्के रिटर्न आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये टाटा समुहाचा हा टेलिकॉम स्टॉक 122 रुपयांवरून घसरून 100 रुपयांवर आला आहे. यादरम्यान या शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली. 2022 मध्ये हा स्टॉक तब्बल 215 रुपयांवरुन घसरून 100 रूपयांवर पोहोचला.

गेल्या दोन वर्षांमध्ये टीटीएमएलच्या स्टॉकनं 7.55 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत झेप घेतली. जी 1200 टक्के रिटर्न दर्शवते. याच प्रकारे गेल्या तीन वर्षांमध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक 2.50 रुपयांवरुन 100 रुपयांच्या स्तरावर पोहोचला.

एखाद्या व्यक्तीनं या शेअरमध्ये दोन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज 13 लाख रुपये झाले असते. जर कोणत्याही गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज 40 लाख रूपये झाले असते. (टीप- या लेखात शेअर संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)