Jio, Airtel ची झोप उडणार! मुंबई, दिल्लीत लवकर 5G सेवा मिळणार, MTNL-BSNL मध्ये डील By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:52 PM 2024-08-16T14:52:45+5:30 2024-08-16T15:22:25+5:30
MTNL-BSNL : बीएसएनएल आणि एमटीएनएलनं सर्व्हिस डीलवर स्वाक्षरी केली आहे. सध्या बीएसएनएल (BSNL) सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच कंपनीनं एक नवीन डील केली आहे. तसंच, आता बीएसएनएलचे युजर्स ४ जी आणि ५ जी सर्व्हिसची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही बीएसएनएलच्या नवीन सर्व्हिसची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. कारण, बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी एक डील केली आहे.
बीएसएनएल आणि एमटीएनएलनं सर्व्हिस डीलवर स्वाक्षरी केली आहे. बीएसएनएलकडून एमटीएनएल ऑपरेशनला ओव्हरटेक केलं जाऊ शकतं, अशी यापूर्वी चर्चा सुरु होती. एमटीएनएल बोर्डानं आता सर्व्हिस डीलला हिरवा कंदील दिला आहे. ही डील कंपन्यांनी १० वर्षांसाठी केली आहे. सध्या हे दूरसंचार विभागानेही होल्डवर ठेवलं आहे.
सरकारनं ही डील होल्डवर ठेवली आहे. कारण सध्या सरकारकडून डीलच्या टॅक्स इंप्लिकेशनची चौकशी सुरू आहे. या दोघांमधील ही डील किती महागात पडणार आहे, याची खात्री सरकारला करायची आहे. सरकारला आधीच सॉव्हरेन बॉन्ड थकबाकीचा सामना करावा लागत आहे. आता सरकार कंपनीचा जास्त खर्च उचलू इच्छित नाही.
एमटीएनएलची अवस्था बिकट आहे. सध्या कंपनीवर ३१,९९४.५१ कोटी रुपयांचं कर्ज आहे. एमटीएनएलच्या सर्व कामकाजाची जबाबदारी बीएसएनएलनं घेतली आहे. एमटीएनएल शक्य तितक्या लवकर मार्केटमध्ये परत आणण्याचं बीएसएनएलचं उद्दिष्ट असणार आहे.
सध्या अत्यंत बिकट स्थितीत असलेल्या एमटीएनएलकडून किमान बाजाराचा खर्च भागवला जाऊ शकतो. बीएसएनएल आधीच दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये आपलं नेटवर्क मजबूत करत आहे. यामध्ये ४ जी आणि ५ जीचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेत्र सध्या एमटीएनएलद्वारे सर्व्हिस देत आहेत.
बीएसएनएल बद्दल बोलायचे झाल्यास, बीएसएनएलची ५ जी टेस्ट सुरू झाली आहे. यापूर्वीही या नेटवर्कद्वारे कॉल करण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, लवकरच नवीन नेटवर्क येऊ शकतं. यामध्ये ५ जी सर्वात खास असणार आहे. खुद्द केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सांगितलं होतं की, बीएसएनएलचं नेटवर्क येण्यास विलंब झाला आहे, पण ते अधिक चांगलं व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजेच, नेटवर्कची स्थिती सुधारण्यासाठी काम केलं जात आहे.
आता मार्केटबद्दल बोलायचं झाल्यास ही डील दूरसंचार कंपन्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. कारण सध्या मार्केटमध्ये जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या कंपन्यांचं वर्चस्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी या कंपन्यांचे रिचार्ज महाग झाल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन अचानक बदलल्याचे दिसून आले. अनेक लोकांना आपलं नेटवर्क पोर्ट केल्याचेही समोर आले.