शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करायची असेल तर 'या' स्कीमचा विचार करू शकता, असा रिटर्न मिळेल की विसराल FD
By जयदीप दाभोळकर | Updated: March 6, 2025 08:33 IST2025-03-06T08:20:38+5:302025-03-06T08:33:57+5:30
Investment Tips: लोकांसाठी एफडी हा वर्षानुवर्षे गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला गेलाय. परंतु आजच्या काळात असे अनेक पर्याय आहेत जे एफडीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतात.

Investment Tips: लोकांसाठी एफडी हा वर्षानुवर्षे गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला गेलाय. परंतु आजच्या काळात असे अनेक पर्याय आहेत जे एफडीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतात.
जर तुम्हाला २ ते ३ वर्षांसाठी रक्कम गुंतवायची असेल आणि गुंतवणुकीवर थोडी जोखीम घेण्याची हिंमत असेल तर एकदा डेट फंडांचा विचार करता येऊ शकतो. डेट फंड हा म्युच्युअल फंडातील सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो आणि त्यात एफडीपेक्षा चांगला परतावा देण्याची क्षमता असते. जाणून घेऊया त्याचे फायदे, परतावा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी.
डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल आणि नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर इत्यादी फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. म्हणजेच डेट फंडाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवले जातात. इक्विटीपेक्षा डेट फंड अधिक सुरक्षित मानले जातात. यामध्ये लिक्विडिटीची कोणतीही समस्या नाही, म्हणजेच तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. साधारणपणे डेट फंडांची मॅच्युरिटी डेट ठरलेली असते.
नफ्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर डेट फंड तुम्हाला एफडीपेक्षा थोडा चांगला परतावा देऊ शकतात. साधारणपणे १ वर्ष ते ३ वर्षांच्या एफडीवर तुम्हाला ६% ते ७% किंवा ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं. पण डेट फंडांचा परतावा ९ टक्क्यांच्या आसपास असल्याचं मानलं जातं. अशावेळी डेट फंडात पैसे गुंतवून तुम्ही अधिक नफा कमावू शकता. मात्र, डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी इक्विटीसारख्या उच्च परताव्याची अपेक्षा करता येत नाही.
कराबाबत बोलायचं झालं तर डेट फंडातून होणाऱ्या नफ्यावर कराची तरतूद आहे. डेट म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या संपूर्ण नफ्यावर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो. जर तुम्ही एप्रिल २०२३ पूर्वी फंड खरेदी केला असेल तर तुम्हाला जुन्या नियमांनुसार कर आकारला जाईल. जर तुम्ही एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर फंड खरेदी केला असेल तर तुमच्या नफ्यावर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जाईल.
पूर्वी फंड खरेदी केला असेल तर तुम्हाला जुन्या नियमांनुसार कर आकारला जाईल. जर तुम्ही एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर फंड खरेदी केला असेल तर तुमच्या नफ्यावर इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जाईल. तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या होल्डिंग्सवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर (STCG) गुंतवणूकदाराच्या इन्कम स्लॅबनुसार कर आकारला जातो. तीन वर्षांहून अधिक कालावधीच्या होल्डिंग्सवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (LTCG) इंडेक्सेशन बेनिफिट्ससह २० टक्के कर आकारला जातो. तर दुसरीकडे एफडीबद्दल सांगायचं झालं तर ५ वर्षांची एफडी करमुक्त असते. यापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)