Mutual Funds: दुप्पट फायदा करवते 'ही' स्कीम; जबरदस्त रिटर्नही मिळेल आणि इन्कम टॅक्सही वाचवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 09:31 IST2024-12-13T09:19:34+5:302024-12-13T09:31:26+5:30

हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करू लागले आहेत. शेअर बाजारात जोखीम अधिक असली तरी मिळणारा परतावा हा जास्त असल्यानं अनेकांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

Mutual Funds Investment News: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करू लागले आहेत. शेअर बाजारात जोखीम अधिक असली तरी मिळणारा परतावा हा जास्त असल्यानं अनेकांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त रिस्क घ्यायची नसेल आणि जास्तीत जास्त व्याज मिळवायचं असेल तर म्युच्युअल फंड ही एक चांगली योजना ठरू शकते.

शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा त्यात जोखीम कमी असते. याशिवाय चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. म्युच्युअल फंडातील परतावा देखील इतर सर्व योजनांपेक्षा चांगला आहे. शेअर बाजारातील जोखमीवर ही योजना अवलंबून असल्यानं त्यातील परतावा निश्चित नसला तरी दीर्घ मुदतीत त्याचा सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार आहेत. सहसा त्यात केलेली गुंतवणूक कराच्या कक्षेत येते. पण एक अशी योजना आहे जी तुम्हाला टॅक्स बेनिफिट्सही देते. या योजनेचे नाव इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) असं आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या व्याजाचा लाभ घेण्याबरोबरच इन्कम टॅक्स वाचवू शकता.

ईएलएसएस फंडातील एकूण रकमेपैकी किमान ८० टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतविली जाते. जोखीम कमी करण्यासाठी या फंडाचे पैसे विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. ईएलएसएसमध्ये आपल्याकडे आपल्या बजेट आणि सोयीनुसार योजना निवडण्याचा पर्याय असतो.

फक्त ५०० रुपयांपासून तुम्ही यात गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. तज्ज्ञांच्या मते, ईएलएसएसमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. अशा परिस्थितीत संपत्ती निर्मितीची क्षमता त्यात असते.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करू शकता आणि एसआयपीच्या माध्यमातूनही करू शकता. त्याचा लॉक-इन कालावधी एनएससी, टॅक्स सेव्हिंग एफडी सारख्या योजनांपेक्षा कमी आहे. या योजनांचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे, तर ईएलएसएसचा लॉक-इन कालावधी केवळ तीन वर्षांचा आहे.

जर तुम्ही ३ वर्षानंतर ईएलएसएस योजनांमधून पैसे काढले तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळतात. यामध्ये इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत जास्तीत जास्त दीड लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत प्राप्तिकरात सूट मिळते. या कपातीचा लाभ तुम्हाला जुन्या करप्रणालीतच मिळणार आहे.

याशिवाय गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला आणखी एक करसवलत मिळते. त्यात मिळणाऱ्या परताव्यावर भांडवली नफा करही आकारला जातो. ईएलएसएसवरील एक लाख रुपयांपर्यंतचा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स करमुक्त आहे. या पातळीपेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के दरानं कर आकारला जातो. याशिवाय सेस आणि अधिभार भरावा लागतो.

याशिवाय गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला आणखी एक करसवलत मिळते. त्यात मिळणाऱ्या परताव्यावर भांडवली नफा करही आकारला जातो. ईएलएसएसवरील एक लाख रुपयांपर्यंतचा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स करमुक्त आहे. या पातळीपेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के दरानं कर आकारला जातो. याशिवाय सेस आणि अधिभार भरावा लागतो.