Navi Technologies IPO: Flipkart चे सचिन बन्सल करणार धमाका; कमाईची मोठी संधी, नव्या कंपनीचा आणणार IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:47 AM2022-03-14T08:47:53+5:302022-03-14T08:59:27+5:30

या कंपनीत बन्सल यांची ४ हजार कोटींची गुंतवणूक आहे.

Navi Technologies IPO: फ्लिपकार्टचे को फाऊंडर सचिन बन्सल याची नवी कंपनी नॅवी टेक्नॉलॉजीनं आपल्या आयपीओसाठी सेबीमध्ये ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. या कंपनीत बन्सल यांची ४ हजार कोटींची गुंतवणूक आहे.

फ्लिपकार्टचे को-फाऊंडर (Flipkar Co-Founder) सचिन बन्सल (Sachin Bansal) यांच्या नेतृत्वाखालील नॅवी टेक्नॉलॉजीज इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणण्याच्या तयारीत हे. कंपनीने ३,३५० कोटी रुपयांच्या IPO साठी सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.

या IPO च्या ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, प्रस्तावित IPO अंतर्गत फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. सचिन बन्सल यांनी या कंपनीत आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आयपीओद्वारे ते आपली भागीदारी कमी करणार नाहीत.

या प्रकरणाची माहिती असलेल्या जाणकारांच्या मते कंपनीचा हा आयपीओ (Navi Technologies IPO) जून महिन्यात येण्याची शक्यता आहे. ड्राफ्ट पेपरनुसार कंपनी ६७० कोटी रूपयांच्या प्री आयपीओ प्लेसमेंटच्या शक्यता पडताळत आहे. जर असं झालं तर आयपीओचा आकार कमी होऊ शकतो.

आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनी नॅवी फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड (NFPL) आणि नॅवी जनरल इन्श्युरन्स लिमिडेटमध्ये (NGIL) गुंतवणूक आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी करणार आहे. फ्लिपकार्ट सोडल्यानंतर बन्सल यांनी २०१८ मध्ये अंकित अग्रवाल यांच्या सोबत नॅवीची स्थापना केली होती.

Navi Technologies Company ही टेक्नॉलॉजीवर आधारित फायनॅन्शिअल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस कंपनी आहे. कंपनी Navi या ब्रँडनेमनं पर्सनल लोन (Personal Loan), होम लोन (Home Loan), जनरल इन्शुरन्स (General Insurance) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) प्रोडक्ट ऑफर करते. ही कंपनी 'Chaitanya' या ब्रँड नावानं पूर्ण स्वामित्व असलेल्या सब्सिडायरीच्या माध्यमातून मायक्रोफायनॅन्स लोनही ऑफर करते.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार Navi एक डिजिटल लेंडिंग अॅप आहे. तसंच पूर्णपणे पेपरलेस प्रोसेसद्वारे तात्काळ २० लाख रूपयांचं कर्जही देते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities), BofA Securities आणि अॅक्सिस कॅपिटल (Axis Capital), Credit Suisse Securities (India) Pvt Ltd आणि एडलवाइज फाइनॅशियल सर्व्हिसेस (Edelweiss Financial Services) या पब्लिक ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनजर आहेत.

मायक्रोफायनॅन्स सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी Navi नं २०१९ मध्ये चैतन्य इंडिया फिन क्रेडिटचं (Chaitanya India Fin Credit) चं अधिग्रहण केलं होतं. चैनत्यनं युनिव्हर्सल बँकिंग लायसन्ससाठी रिझर्व्ह बँकेतही अर्ज केला आहे.