Nazara Technologies : ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रिमिअमवर शेअर; राकेश झुनझुनवालांची आहे कंपनीत गुंतवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 01:42 PM 2021-03-17T13:42:10+5:30 2021-03-17T13:50:59+5:30
rakesh jhunjhunwala Nazara Technologies : गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म नझारा टेक्नॉलॉजीचा आयपीओ आज झाला लाँच. क्रिकेट, छोटा भीमसारख्या गेम्ससाठी प्रसिद्ध आहे कंपनी गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म नझारा टेक्नॉलॉजीचा आयपीओ बुधवारी (१७ मार्च) लाँच झाला. कंपनी या आयपीओद्वारे ५८२.९१ कोटी रूपये उभारण्याच्या तयारीत आहे.
यामध्ये कोणताही नवा शेअर जारी करण्यात येणार नाही. विद्यमान शेअर धारकांद्वारे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून निधी गोळा केला जाणार आहे.
हा आयपीओ १९ मार्चपर्यंत खुला राहिलं. या इश्यूसाठी ११०० ते ११०१ रूपयांचा प्राईज बँड ठरवण्यात आला आहे.
नझारा टेक्नॉलॉजी या कंपनीत शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचा ११ टक्के हिस्सा आहे. परंतु ते आपला हिस्सा कमी करणार नाहीत.
सध्या या आयपीओसाठी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.
ग्रे मार्केटमध्ये नझारा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचा प्रिमिअम वाढला आहे. ग्रे मार्केटमध्ये हे शेअर ८४०-८५० रूपयांच्या प्रिमिअमवर पोहोचले आहेत.
आयपीओसाठी इश्यू प्राईज ही ११००-११०१ रूपये इतकी आहे. याचाच अर्थ हे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रिमिअमवर ट्रेंड करत आहेत.
या आयपीओसाठी लॉट १३ इक्विटी शेअर्सचा ठेवण्यात आला आहे. याचाच अर्थ कमीतकमी १३ शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे.
गुंतवणूकदारांना जास्तीतजास्त १३ लॉट साईजसाठी बोली लावता येणार आहे. म्हणजेच जास्तीत जास्त १ लाख ८६ हजार ०६९ रूपयांची गुंतवणूक करता येईल.
या आयपीओमझ्ये क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, नॉन इन्स्टीट्युशनल गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी केवळ १० टक्के आरक्षित ठेवण्यात आले आहे.
२००० मध्ये नझारा टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना करण्यात आली असून नितीश मित्रसेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
वर्ल्ड क्रिकेड चॅम्पिअनशीप, छोटा भीम, मोटा पतलू सीरिजच्या गेम्ससाठी ही कंपनी प्रामुख्यानं ओळखली जाते.
भारत, दक्षिण आफ्रिका, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट मधील ६० पेक्षा अधिक देशांमध्ये या कंपनीचा व्यवसाय आहे.
सध्या कंपनीची आर्थिक स्थितीही ठिक आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीला तोटा झाला होता. परंतु आर्थिक वर्ष २०१९ मध्ये कंपनी नफ्यात होती.
या इश्यूचं व्यवस्थापन आयआयएफएल सिक्युरिटी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि नोमुरा फायनॅन्शिअल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटी करणार आहे. लिंक इनटाईम इश्यूची रजिस्ट्रार आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होणार आहेत.