New note of Rs 20 in yellow, Know about more
पिवळ्या रंगाची 20 रुपयांची नवी नोट; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्य.. By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 11:40 AM2019-08-01T11:40:57+5:302019-08-01T11:44:04+5:30Join usJoin usNext रिझर्व्ह बँकेकडून लवकरच बाजारात 20 रुपयांची नवीन नोट येणार आहे. ही नोट सध्या उपलब्ध असणाऱ्या नोटांपेक्षा वेगळी आहे. तसेच या नोटेच्या साइजमध्येही बदल करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ही नोट कानपूरमधील रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयात पोहचली असून लवकरच या नोटा बँकांकडे दिले जाणार आहेत. या नोटेवर आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. आरबीआयकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, जरी 20 रुपयांची नवीन नोट बाजारात आली तरी जुन्या 20 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहतील. नवीन येणाऱ्या 20 रुपयांच्या नोटेचा रंग पिवळा असून त्या नोटेवर देशाची संस्कृती दर्शविणारे वेरुळ लेणीचे चित्र आहे. जुन्या 20 रुपयांच्या नोटेपेक्षा नवीन येणारी नोट ही साईजमध्ये छोटी आहे. टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारतीय चलनReserve Bank of IndiaIndian Currency