The next two days, these five things will be expensive
पुढच्या दोन दिवसांनी 'या' पाच गोष्टी महागणार By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 09:25 PM2019-03-29T21:25:24+5:302019-03-29T21:30:59+5:30Join usJoin usNext नव्या आर्थिक वर्षांत सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. सिलिंडरही महाग होणार आहे. जर आपण गाडी खरेदी करणार असाल, तर दोन दिवसांत घेऊन टाका. आता 1 एप्रिलपासून गाडी खरेदी करणं महागणार आहे. कारच्या किमती 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत. टाटा मोटर्सच्या गाड्या 25 हजार तर महिंद्राच्या गाड्यांची किंमत 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत. पीएनजीवरच्या गाडी चालवणंही महागणार आहे. नैसर्गिक गॅसच्या किमतीत 18 टक्क्यांची वाढ होणार आहे. गॅसच्या किमती वाढल्यानं महागाई वाढणार आहे. विमान प्रवासही 1 एप्रिलपासून महागण्याची चिन्हे आहेत. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक सुविधा पुरविण्याची मागणी होत असल्याचं त्याचा भार प्रवाशांवरच पडणार आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवरील उपचार महाग होणार आहेत. कारण स्टेंटची किंमत वाढणार आहे. नव्या किमती 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. टॅग्स :व्यवसायगॅस सिलेंडरbusinessCylinder