एकेकाळी शाळेची फी भरायला नव्हते पैसे, जिकडे मिळाली नोकरी; आज त्याच कंपनीचे आहेत CEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 08:47 AM2023-11-06T08:47:10+5:302023-11-06T09:14:02+5:30

पुनीत रंजन यांनी आजवरच्या खडतर प्रवासातून शून्यातून आपलं जग निर्माण केलं आहे.

असं म्हणतात की एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. हरियाणातील एका छोट्या शहरातून नावारुपास आलेल्या आणि आयटी कंपनी डेलॉइट ग्लोबलचे सीईओ बनलेल्या पुनीत रंजन यांना आज अनेकजण ओळखतात.

पुनीत रंजन यांनी शून्यातून आपलं जग निर्माण केलं आहे. त्यांच्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा पुनीत यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्याकडे शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते.

काही मोठं करायचं असेल तर स्वप्नही मोठी पाहावी लागतात आणि त्यासाठी मेहनतही तितकीच लागते. अशीच अथक मेहनत पुनीत रंजन यांनी केली. फी कमी असल्यामुळे रोहतकमधील स्थानिक महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहून ते नोकरीसाठी दिल्लीलाही गेला होता.

हरियाणातील एका छोट्या गावात जन्मलेल्या पुनीत रंजन यांचं बालपण गरिबीत गेलं. पुनीत यांच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना शाळेची फी भरण्यासही अनेक कष्ट करावे लागत होते. हा तो काळ होता जेव्हा त्यांच्या पालकांकडे त्यांना चांगल्या शाळेत पाठवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते.

फी न भरू शकल्यानं एकता त्यांना शाळाही सोडावी लागली होती. त्यांनी आपलं शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमधून केलं. यानंतर त्यांनी रोहतक येथील एका स्थानिक कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं.

पुनीत यांना आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारायची होती. त्यासाठी ते नोकरीच्या शोधात होते. एका वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात पाहून ते शोधत दिल्लीला आले. नोकरीच्या शोधात असतानाच पुनीत यांनी आपलं पुढील शिक्षण सुरू ठेवलं. दरम्यान, त्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. इथून त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली.

पुनीत दोन जोडी जीन्स आणि काही पैसे घेऊन अमेरिकेला गेले. जिथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुनीत रंजन यांच्या प्रतिभेची ओळख स्थानिक मासिकांमध्ये १० सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून करण्यात आली. यानंतर डेलॉइटनं पुनीत यांना भेटायला बोलावलं. १९८९ मध्ये त्यांना डेलॉइटमध्ये नोकरी मिळाली.

माहितीनुसार पुनीत यांनी डेलॉईटमध्ये ३३ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवाज बजावली. त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ म्हणून डेलॉईटनं २०१५ मध्ये कंपनीनं त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली. डेलॉईट आज जगातील चार सर्वात मोठ्या ऑडिट फर्म पैकी एक आहे. कंपनी सध्या भारतासह जगातील १५० देशांमध्ये पसरलेली आहे. कंपनीत सध्या २ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.