JBF इंडस्ट्रीजचं अधिग्रहण करणार का Reliance?; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:10 PM2021-09-23T17:10:13+5:302021-09-23T17:19:30+5:30Join usJoin usNext JBF इंडस्ट्रीजचं अधिग्रहण करणार का Reliance?; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण गेल्या काही दिवसांपासून देशातील पॉलिस्टर जायंट जेबीएफ इंडस्ट्रीजच्या अधिग्रहणाच्या बातम्या येत होत्या. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), सीएफएम असेट रिकंन्स्ट्रक्शन कंपनीच्या (ARC) सहकार्याने कंपनी अधिग्रहण करेल असं सांगण्यात आलं. मात्र, आता रिलायन्स इंडस्ट्रीजने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. "JBF इंडस्ट्रीज किंवा त्याची मालमत्ता घेण्याबाबत रिलायन्सची कोणतीही चर्चा नाही हे आम्ही तुम्लाहा सूचित करू इच्छितो," असं रिलायन्सने स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आम्ही सुरू असलेल्या संधींचे मूल्यांकन करतो. आम्ही प्रत्येक प्रसंगी सेबी आणि स्टॉक एक्स्चेंजला सूचित केले आहे. भविष्यातही ही प्रक्रिया सुरू राहील," असंही रिलायन्सनं म्हटलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून येत आहे. गुरूवारी कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर 1.38 टक्क्यांच्या तेजीसह 2465 रूपयांपर्यंत पोहोचला. कंपनीनं यापूर्वी 2479.85 रूपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. रिलायन्सनं हा स्तर 6 डिसेंबर रोजी गाठला होता. सध्या कंपनीचं मार्केट कॅप 15 लाख 60 हजार कोटींवर पोहोचलं आहे.टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजारRelianceMukesh Ambanishare market