अशी संधी पुन्हा नाही! सोने झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घट, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 02:17 PM2023-09-20T14:17:30+5:302023-09-20T14:29:15+5:30

आज बाजार सुरु होताच सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याचे दिसून आले.

आज बुधवारी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये सोने ५९,२२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर सुरू झाला.

यानंतर किमतीत काही बदल झाले आणि सध्या ती ०.०७ टक्क्यांनी कमी होऊन ५९,२३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत, गेल्या ट्रेडिंगच्या तुलनेत ४४ रुपये. तर १८ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव ५९,२८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

सोन्यासह आज चांदीचे दरातही आज घट झाली. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी सुरुवातीला ७२,२८४ रुपये प्रति किलोवर व्यवहार सुरू झाला.

यानंतर त्यात काही वाढ नोंदवण्यात आली असून सध्या दुपारी १२.३० वाजता ०.०९ टक्के किंवा ६४ रुपये प्रति किलोने घट होऊन ७२,५०५ रुपये प्रति किलो आहे. काल चांदी ७२,५६९ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

चेन्नई- २४ कॅरेट सोने ६०,५५० रुपये, चांदी ७८,००० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर मुंबईत २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे. दिल्लीत- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे.

कोलकाता- २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर बेंगळुरूमध्ये- २४ कॅरेट सोने ६०,२२० रुपये प्रति किलो, चांदी ७३,२५० रुपये किलो दराने विकली जात आहे.

हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७८,००० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर पुण्यात २४ कॅरेट सोने ६०,२३० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे.

जयपूर- २४ कॅरेट सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे. लखनौमध्ये सोने ६०,३७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलोने विकली जात आहे. पाटणा- २४ कॅरेट सोने ६०,२७० रुपये, चांदी ७४,५०० रुपये किलो दराने विकली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह १,९२९.८६ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदी ०.७ टक्क्यांनी घसरण झाली आणि प्रति औंस २३.०८ डॉलरवर आहे.