Not SBI, 'these' government banks get highest interest on FDs; See the full list
SBI नाही,'या' सरकारी बँकांमध्ये FD वर सर्वाधिक व्याज मिळते; संपूर्ण यादी पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:27 AM2023-11-01T09:27:00+5:302023-11-01T09:34:18+5:30Join usJoin usNext अनेक बँका एफडीवर मोठा परतावा देत आहेत. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अमृत कलश योजनेद्वारे आपल्या ग्राहकांना FD वर जोरदार व्याज देत आहे. मात्र, अनेक बँका एसबीआयपेक्षा जास्त व्याज देत आहेत. अमृत कलश योजनेअंतर्गत, बँक सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के व्याजदर आणि 400 दिवसांच्या FD योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे. तुम्हाला माहित आहे का की इतर अनेक सरकारी बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना SBI पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. बँक ऑफ इंडिया 400 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. बँक ऑफ बडोदा 2 ते 3 वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. पंजाब नॅशनल बँक 444 दिवसांच्या विशेष FD योजनेवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के व्याजदर आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना FD वर 7.75 टक्के व्याजदर देत आहे. पंजाब सिंध बँक 444 दिवसांच्या कालावधीत सामान्य ग्राहकांना 7.40 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के व्याजदर देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक कॅनरा बँक 444 दिवसांच्या FD योजनेवर सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे.टॅग्स :बँकएसबीआयbankSBI