दंड नको तर लक्षात ठेवा 'या' तारखा, असे आहे नोव्हेंबरचे 'इन्कम टॅक्स कॅलेंडर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:16 PM2024-11-06T17:16:48+5:302024-11-06T17:24:00+5:30

Income Tax Calendar November 2024: करविषयक कामासाठी आयकर विभागाकडून वेळापत्रक तयार केले जाते. यालाच इन्कम टॅक्स कॅलेंडर असंही म्हटलं जातं.

आयकर विभागाच्या विविध करविषयक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरलेली आहे. त्याला 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' असे म्हटले जाते. या कालमर्यादा न पाळल्यास करदात्यास दंड भरावा लागतो. नोव्हेंबर २०२४ मधील 'इन्कम टॅक्स कॅलेंडर' बद्दल जाणून घेऊ या.

७ नोव्हेंबर : ऑक्टोबर २०२४ मध्ये कापलेला कर जमा करण्याची अंतिम तारीख आहे. ४ नोव्हेंबर : सप्टेंबर २०२४ मध्ये कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४-एम आणि १९४-एस अनुसार केलेल्या कपातीचे टीडीएस सर्टिफिकेट जारी करण्याची तारीख आहे.

१५ नोव्हेंबर : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील टीडीएस सर्टिफिकेट (वेतनेतर उत्पन्न) जारी करण्याची तारीख आहे.

३० नोव्हेंबर : ऑक्टोबरमध्ये कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४-एम आणि १९४-एस अनुसार कापण्यात आलेल्या कराशी संबंधित चालान-कम-स्टेटमेंट सादर करण्याची तारीख आहे.

(फॉर्म-६४) वित्त वर्ष २०२३-२४ मधील वितरित उत्पन्नाशी संबंधित व्हेंचर कॅपिटल कंपनी अथवा व्हेंचर कॅपिटल फंड यांच्याकडून इन्कम डिस्ट्रिब्युशन स्टेटमेंट सादर करणे आवश्यक. वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये यूनिट होल्डर्सना बिझनेस ट्रस्टकडून वितरित उत्पन्नाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.

कंपनी कलम ३५ (२एबी) अनुसार वेटेज डिडक्शनसाठी पात्र असेल तर तिला अकाउंट ऑडिटची प्रत (कंपनीचे काही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशेष व्यवहार असल्यास) सेक्रेटरीस द्यावी लागेल.

आयकर विवरण पत्र जमा करण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ असल्यास नियम ५ डी, ५ ई आणि ५ एफ अनुसार वैज्ञानिक संशोधन संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये अथवा विशिष्ट संशोधक कंपनी यांना स्टेटमेंट सादर करावे लागेल.