now book lpg cylnder via online platform and get extra discount on gas cylinder
आता विनाअनुदानित सिलेंडरवरही मिळवा सवलत; जाणून घ्या बुकिंगची 'ही' पद्धत By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 10:49 PM2020-11-18T22:49:16+5:302020-11-18T22:52:58+5:30Join usJoin usNext एलपीजी गॅस सिलेंडरच्या वापरकर्त्यांसाठी एक कामाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडरचा वापर करणारे ग्राहक आता विनाअनुदानित सिलेंडरवरही मोठी सवलत मिळवू शकतात. एलपीजी सिलेंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी मोदी सरकारनं आधीच उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना मिळणारी सवलत थेट बँक खात्यात जमा होते. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना वर्षाकाठी १२ सिलेंडर मिळतात. या सिलेंडरवर ग्राहकांना अनुदान मिळतं. १२ च्या पुढे सिलेंडर वापरल्यास त्या सिलेंडरच्या रकमेवर अनुदान मिळत नाही. मात्र आता विनाअनुदानित सिलेंडरवरदेखील अनुदान मिळू शकतं. मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी तेल कंपन्या ग्राहकांना कॅशबॅकची सुविधा देत आहेत. तुम्ही सिलेंडरची रक्कम डिजिटल माध्यमाचा वापर करून भरल्यास तुम्हाला कॅशबॅकची सुविधा मिळेल. हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम आपल्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट केल्यावर सूट देत आहेत. सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास सिलेंडर बुक करताना रोख रकमेऐवजी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा. Paytm, Phonepe, Google Pay, UPI आणि Mobikwik सारख्या पर्यायांचा वापर करून सिलेंडर बुक केल्यास सवलत मिळू शकते. पहिल्यांदा ऑनलाईन पेमेंट करताना तेल कंपन्या मोठी सवलत देतात. Paytm आपल्या ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देतं.टॅग्स :गॅस सिलेंडरपे-टीएमगुगल पेCylinderPaytmgoogle pay