BSNL New Recharge Plan: आता कमी पैशात मिळणार जास्त इंटरनेट! जाणून घ्या काय आहे BSNL चा नवीन रिचार्ज प्लॅन? By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:06 PM 2024-08-01T13:06:07+5:30 2024-08-01T13:11:03+5:30
BSNL New Recharge Plan: Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे आता अनेकांनी कार्ड पोर्ट करुन बीएसएनएल जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी वाढ केली. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
यामुळे आता बीएसएनएल लाखो ग्राहकांची आशा बनली आहे. मोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महाग होत असल्याने लोक बीएसएनएलकडे वळू लागले आहेत.
बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आता BSNL आपला नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन आणत आहे.
BSNL ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये बदल केलेला नाही. बीएसएनएलने आपल्या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणेच नवीन गोष्टींचा समावेश केला आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.
बीएसएनएलने आपल्या रिचार्जची वैधता वाढवली आहे. बीएसएनएलच्या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना ३९५ दिवसांची वैधता मिळत आहे.
BSNL १४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन. बीएसएनएलच्या या रिचार्जमध्ये युजरला ३३६ दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये यूजर्सना 336 दिवसांसाठी अमर्यादित मोफत कॉलिंग, 24GB डेटा आणि दररोज १०० SMS ची सुविधा मिळेल. जे कमी डेटा वापरतात त्यांच्यासाठी १,४९९ रुपयांचे रिचार्ज सर्वोत्तम आहे.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन १९९९- या प्लॅनमध्ये युजरला ३६५ दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 600GB डेटा मिळतो, जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. याशिवाय, वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस, अमर्यादित कॉलिंग आणि ३० दिवसांसाठी मोफत BSNL ट्यून सुविधा मिळेल.
BSNL २३९९ रिचार्ज प्लॅन- BSNL च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना ३९५ दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळेल. यासोबतच तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल आणि तुम्हाला दररोज १०० SMS देखील मिळतील. हा प्लॅन खरेदी करून, वापरकर्त्याला हार्डी गेम्स+चॅलेंजर अरेना गेम्स+ गेमऑन आणि ॲस्ट्रोटेल+गेमियम+झिंग म्युझिक +वॉव एंटरटेनमेंट +बीएसएनएल ट्यून्स+लिस्टन पॉडकास्टची सेवा देखील मिळेल.