now you will be able to apply for pan card passport from ration shops electricity water bills
आता PDS च्या रेशन दुकानांवरूनही PAN-Passport साठी अर्ज करता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:55 AM2021-09-21T10:55:23+5:302021-09-21T11:02:24+5:30Join usJoin usNext वीज, पाण्याचं बिलही भरता येईल. अनेक प्रकारच्या सुविधाही सुरू करण्यात येणार. आता तुम्ही तुमच्या शेजारच्या रेशन दुकानातून (PDS ration shops) पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्टसाठी अर्ज (Apply for passport) करू शकाल. एवढेच नाही तर तुम्ही अशा दुकानांवर वीज, पाणी आणि इतर बिलांचाही भरणा करू शकणार आहात. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं (Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution) रेशन दुकानांचं उत्पन्न वाढवण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (CSC) सोबत करार केला आहे. याअंतर्गत ग्राहकांशी संबंधित अतिरिक्त सुविधा जसे की पॅन, पासपोर्टसाठी अर्ज करणं, वीज, पाणी इत्यादींसह युटिलिटी बिलांचा भरणा करण्यासारख्या सुविधा दिल्या जातील. रेशन दुकानं सीएससी सेवा केंद्र म्हणून विकसित केली जातील. अशा CSC केंद्रांना त्यांच्या सोयीनुसार अतिरिक्त सेवा निवडण्यास सांगितलं जाईल. यामध्ये बिल भरणं, पॅन अर्ज, पासपोर्ट अर्ज, निवडणूक आयोगाशी संबंधित सेवा इत्यादी सेवांचा समावेश आहे. या सेवा ग्राहकांना जवळच्या रेशन दुकानात उपलब्ध होतील आणि दुसरीकडे या दुकानांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत देखील मिळतील, असं मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. तसेच, ग्राहकांसाठी सुलभता आणि सुविधा सुधारण्यासाठी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे पुरवलेल्या रेशन कार्ड सेवा जसे नवीन कार्डसाठी अर्ज करणे, विद्यमान रेशन कार्ड अपडेट करणे, आधार कार्डशी जोडण्याची विनंती, उपलब्धता स्थिती तपासणी आणि तक्रार यासारख्या रेशन सेवा विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीएसीद्वारे नोंदणी अतिरिक्त पर्याय म्हणून प्रदान केली जाऊ शकते. या एमओयूचा हेतू हा इच्छुक दुकान डीलर्सद्वारे सीएससी सेवाच्या मदतीनं रेशन दुकानांसाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचं उत्पन्न वाढवणं हे असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. टॅग्स :व्यवसायपॅन कार्डपासपोर्टबिलbusinessPan Cardpassportbill