आता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ By बाळकृष्ण परब | Published: September 23, 2020 08:49 AM 2020-09-23T08:49:00+5:30 2020-09-23T08:58:20+5:30
बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगची सुविधा प्रचलित झालेली आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्यांनाही नेट बँकिंगचा वापर करता येणार आहे. सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय म्हणून पोस्टाचा पर्याय अनेकजणांकडून वापरला जातो. मात्र पोस्टाचे अनेक व्यवहार करण्यासाठी नेहमी पोस्टात जावे लागते. पण आता पोस्टाने दिलेल्या विशेष सुविधेमुळे घरबसल्या पोस्टाचे विविध व्यवहार करता येणार आहेत.
बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगची सुविधा प्रचलित झालेली आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्यांनाही नेट बँकिंगचा वापर करता येणार आहे. सेव्हिंग अकाऊंटसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पोस्ट खात्याचे कोट्यवधी ग्राहक घरबसल्या आर्थिक व्यवहारांची अनेक आवश्यक कामे करू शकतील. तसेच इंटरनेट बँकिंगच्या मदतीने आरडी, पीएफ,एनएससी या योजनांशी संबंधित सर्व कामेही घरबसल्या करता येतील. जाणून घेऊया पोस्टाच्या नेट बँकिंग सुविधेचा लाभ कसा घेता येईल, याबाबत.
नेट बँकिंगसाठीच्या अटी इंडिया पोस्ट बचत खाते वापरणाऱ्या ग्राहकांना नेटबँकिगच्या सुविधेचा वापर करण्यासाठी काही अटी लागू असतील. संबंधित ग्राहकाकडे योग्य सिंगल किंवा जॉईंट खाते असले पाहिजे. केवायसी संबंधीची कागदपत्रे, अॅक्टिव्ह एटीएम कार्ड, मोबाइल क्रमांक अकाऊंटला लिंक असला पाहिजे. तसेच अकाऊंटला ईमेल आयडी रजिस्टर्ड असला पाहिजे. तसेच पॅनकार्ड क्रमांक अकाऊंटला रजिस्टर असला पाहिजे.
पोस्ट ऑफीसमध्ये अर्ज जर तुम्ही नेट बँकिंगसंबंधीच्या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही पोस्टात जाऊन नेट बँकिंगसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुमचे नेटबँकिंग अॅक्टिव्ह होईल. इंटरनेट बँकिंग यशस्वीपणे अॅक्टिव्ह झाल्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्टच्या नेट बँकिंग साइटवर जाऊन न्यू यूझर अॅक्टिव्हेशन हायपरलिंकच्या माध्यमातून अॅक्टिव्ह करावे लागेल. त्यासाठी तुमच्याजवळ तुमचा कस्टमर आयडी किंवा सीआयएफ आणि अकाऊंट आयडी असला पाहिजे.
कशा प्रकारे करता येईल नेटबँकिंगचा वापर सर्वात आधी इंडिया पोस्टच्या www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जा. त्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायांवर जाऊन ऑनलाइन बँकिंगच्या पर्यायावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ब्राऊझर एक नवी विंडो ओपन करण्यासाठी री-डायरेक्टची परवानगी मागेल. त्यावर ओके क्लिक करा.
पुढील प्रक्रिया त्यानंतर तुम्ही आपला युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगइन करू शकता. जर तुमचा नेटबँकिंग युझर आयडी तयार झाला नसेल. तर याच विंडोच्या खाली दिलेल्या New User Activation या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडे कस्टमर आयडी आणि अकाऊंट आयडी मागितला जाईल. त्याची नोंदणी करा आणि कंटिन्यू बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्याकडे अकाऊंटच्या संदर्भातील काही अजून माहिती मागितली जाईल. ही माहिती दिल्.ानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करण्यास सांगितले जाईल. पासवर्ड तयार केल्यानंतर तुमचा नेटबँकिंग युझर आयडी आणि पासवर्ड अॅक्टिव्ह होईल. त्याचा वापर करून तुम्ही अकाऊंट लॉगइन करू शकाल. पोस्ट बँक नेट बँकिंग सेवेशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्येसाठी 18004252440 या क्रमांकावर तु्म्ही कॉल करू शकता. तसेच dopebanking@indiapost.gov.in या मेलआयडीवर ईमेल करू शकता.