NPS ची भन्नाट योजना, मोबाइल नंबरद्वारे खाते उघडा आणि ६० व्या वर्षी पेन्शन व ४५ लाखांचा घसघशीत लाभ मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:36 AM 2020-07-09T07:36:58+5:30 2020-07-09T07:47:39+5:30
जर तुम्हीही वृद्धापकाळासाठीच्या आर्थिक नियोजनाबाबत तु्म्हीही चिंतीत असाल तर तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल पेन्शन स्कीम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. वाढत्या वयासोबत काम करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या वृद्धापकाळाची चिंता सतावत असते. जर तुम्हीही वृद्धापकाळासाठीच्या आर्थिक नियोजनाबाबत तु्म्हीही चिंतीत असाल तर तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल पेन्शन स्कीम हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ठराविक गुंतवणुकीनंतर तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी एकरकमी मोठी रक्कम आणि दरमहा पेन्शनही मिळते. आता या योजनेमध्ये पैसे गुंतवणेही सोपे झाले आहे.
हल्लीच पीएफआरडीएने आपल्या सब्सक्रायबर्सना वन टाइम पासवर्डद्वारे एनपीसीमध्ये खाते उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्ही रजिस्टर मोबाइल नंबरद्वारे ओटीपी मिळवून खाते उघडू शकता. या खात्याद्वारे तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षी ४५ लाख रुपयांपर्यंतचा एकरकमी घसघशील लाभ मिळवू शकता. तसेच २२ हजारांहून अधिक दरमहा पेन्शन मिळवू शकता.
एनपीएसमध्ये खाते उघडण्यासाठीची अट १८ ते ६५ वर्षांपर्यंतचा कुणीही भारतीय नागरिक एनपीएस योजनेचा भाग बनू शकतो. एनपीएसमध्ये जमा होणाऱ्या रकमेची गुंतवणूक करण्याची जबाबदारी पीएफआरडीएने रजिस्टर्ड पेन्शन फंड मॅनेजर्सला दिली जाते. ही संस्था तुमची रक्कम इक्विटी, गव्हर्मेंट सिक्युरिटी आणि नॉन गव्हर्मेंट सिक्युरिटीमध्ये तसेच फिक्स इन्कम इंस्टुमेंटमध्ये गुंतवते.
दोन प्रकारची खाती उघडता येतात एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती उघडण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. ते पर्याय म्हणजे पेन्शन अकाऊंट आणि वॉलंटियरी सेव्हिंग अकाऊंट. पेन्शन अकाऊंट उघडणाऱ्याला सेव्हिंग अकाऊंट उघडण्याचासुद्धा अधिकार असतो.
किती गुंतवणूक करावी लागते जर तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी एकरकमी ४५ लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा सहा हजार रुपये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे तुम्ही ३० वर्षांत २१.६ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. आठ टक्के व्याज दराने मॅच्युरिटीवेळी ही रक्कम ९० लाख इतकी होईल.
या गुंतवणुकीमधील एक अट म्हणजे तुम्हाला ५० टक्के एन्यूटी खरेदी करावे लागेल. त्यावर तुम्हाला सरासरी ६ टक्के व्याज मिळेल. त्यामुळे ६० व्या वर्षी तुम्हाला ४५ लाख रुपये एकरकमी मिळतील.
तुम्ही मॅच्युरिटी अमाऊंटमधील ६० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला या रकमेवर कर भरवा लागणार नाही.