NPS Investing in National Pension Scheme for secure future retirement pension income
सरकारी नोकरी नाही? NPSमधील गुंतवणूक तुम्हाला दर महिन्याला देऊ शकते 45 हजार रुपयांची पेन्शन By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 7, 2020 09:00 PM2020-10-07T21:00:55+5:302020-10-07T21:16:28+5:30Join usJoin usNext जानेवारी 2004मध्ये नॅशनल पेन्शन स्कीमची (NPS) सुरुवात करण्यात आली. या योजनेत सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचारीच पैसे टाकू शकत होते. मात्र, 2009पासून ही योजना सर्व प्रकारच्या लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. म्हणजेच आता कुणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता तर खासगी नोकरी करणारे लोकही या योजनेशी जोडले जात आहेत. निवृत्तीनंतरही चागल्या कमाईचा मार्ग - नवृत्तीनंतरही चांगली कमाई सुरू रहावी, असे आपल्याला वाटत असेल तर आपण NPS खाते उघडू शकता. हे खाते आपल्याला आपल्या अथवा अपल्या पत्नीच्या नावानेही उघडता येऊ शकते. या योजनेत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वन टाईम कॅश आणि मासिक पेन्शनची सुविधाही मिळते. याचा अर्थ वयाच्या 60 वर्षांनंतर आपल्याला कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. गुंतवणुकीची पद्धत - आपण आपल्या कमाईनुसार, NPS खात्यामध्ये महिन्याला अथवा वर्षाला पैसे जमा करू शकता. आपण NPSमध्ये महिन्याला 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीपासूनही सुरुवात करू शकतात. आपण हे वयाच्या 65 वर्षापर्यंतही सुरू ठेऊ शकता. NPS गुंतवणुकीवर 40 टक्के अॅन्यूइटी विकत घेणे आवश्यक आहे. तर 60 टक्के रक्कम 60 वर्षांनंतर एकाच वेळी (वन टाईम) काढता येऊ शकते. चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय - उदाहरणच द्याचे तर, वयाच्या 30व्या वर्षापासून आपण NPS अकाउंटमध्ये महिन्याला 5,000 रुपये जमा करायला सुरुवात केली आणि हे 30 वर्षापर्यंत, म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत सुरूच ठेवले, तर या गुंतवणुकीवर 10 टक्के रिटर्नसह वयाच्या 60व्या वर्षी आपल्या अकाउंटवर 1.12 कोटी रुपये होतील. नियमानुसार, आपले वय 60 वर्ष होताच आपल्याला एका वेळी म्हणजेच वन टाईम 60 टक्के रक्कम काढता येईल. याशिवाय दरमहिन्याला जवळपास 45,000 रुपये पेन्शनही मिळेल. गुंतवणूकदार 30 वर्षांत एकूण 18 लाख रुपये जमा करेल. यावर 10 टक्के वर्षिक रिटर्नचा अंदाज लावण्यात आला आहे. व्याजदर कमी अधिकही होऊ शकतात. वयाच्या 60 वर्षांनंतर काढू शकता पैसे - मॅच्युरिटीनंतर गुंतवणुकदार NPSमधून 60 टक्के रक्कम काढू शकतो. म्हणजेच वयाच्या 60व्या वर्षानंतर संबंधित व्यक्ती NPSमध्ये जमा असलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कुठल्याही टॅक्स शिवाय काढू शकते. NPSमध्ये दोन प्रकारचे अकाउंट असतात. टायर-1 आणि टायर- 2. 18 ते 65 वर्षातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आपण कुठल्याही बँकेत NPS अकाउंट उघडू शकता. टॅक्समध्येही मिळते सूट - NPSमध्ये ग्राहकांना टॅक्समधूनही सूट मिळते. इनकम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80-C अंतर्गत आपण 1.5 लाख रुपयांशिवाय 50,000 रुपयांचा बेनिफिट टॅक्सदेखील घेऊ शकता. एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यास आपण आयकरात 2 लाख रुपयांची सूटही मिळवू शकतात. पैसेही राहतील सुरक्षित - आपण घरबसल्याही ऑनलाईन (eNPS) अकाउंट उघडू शकता. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (PFRDA) एनपीएस चालवले जाते. यामुळे हे अत्यंत सुरक्षित आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर एनपीएस अकाउंट उघडण्यात आले आहेत.टॅग्स :निवृत्ती वेतनकर्मचारीबँकPensionEmployeebank