NPS (National Pension Scheme) : ४० व्या वर्षी सुरू केलं NPS, कसं मिळेल ₹५०००० चं पेन्शन; किती द्यावं लागेल योगदान? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:44 AM 2024-08-23T08:44:04+5:30 2024-08-23T08:56:43+5:30
NPS Pension Calculator: निवृत्तीनंतर तुमचं आयुष्य अनेकदा नोकरीदरम्यान जसं असतं तसं राहत नाही. आपल्याकडे तेव्हा भरपूर वेळ असतो, परंतु ना शरीर तितके कष्ट करू शकतं आणि ना उत्पन्न खूप चांगलं मिळतं. NPS Pension Calculator: निवृत्तीनंतर तुमचं आयुष्य अनेकदा नोकरीदरम्यान जसं असतं तसं राहत नाही. आपल्याकडे तेव्हा भरपूर वेळ असतो, परंतु ना शरीर तितके कष्ट करू शकतं आणि ना उत्पन्न खूप चांगलं मिळतं. विशेषत: खाजगी नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर उत्पन्नाचं कोणतंही साधन नसतं.
अशा वेळी स्वत:साठी रिटायरमेंट प्लॅनिंग (Retirement Planning) वेळीच करणं खूप गरजेचं आहे. त्यात उशीर झालाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता जास्त विचार करू नका. आपल्या निवृत्तीनंतरच्या चांगल्या उत्पन्नाचे नियोजन सुरू करा.
एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम ही या बाबतीत चांगली योजना ठरू शकते. ही एक सरकारी योजना आहे जी बाजाराशी जोडलेली आहे म्हणजेच त्याचा परतावा बाजारावर आधारित आहे.
रिटायरमेंट प्लॅनिंगनुसार ही योजना खूप लोकप्रिय आहे कारण यात तुमच्यासाठी एकरकमी रकमेसह तुमच्या पेन्शनचीही व्यवस्था केली जाते. जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर ५०,००० रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला त्यात किती गुंतवणूक करावी लागेल?
१८ ते ७० वयोगटातील कोणीही एनपीएसमध्ये योगदान देऊ शकतो. एनपीएसमध्ये तुम्ही जे काही योगदान द्याल, तो पैसा दोन भागांत विभागला जातो. निवृत्तीनंतर तुम्ही एकूण निधीच्या ६०% रक्कम एकरकमी घेऊ शकता आणि ४०% अॅन्युईटीमध्ये जाते, ज्यामुळे तुमची पेन्शन वाढते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) ही योजना राबवते.
निवृत्तीनंतर किमान ५० हजार रुपये पेन्शन मिळेल, असा विचार करून तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यात चांगली गुंतवणूक ठेवावी लागेल. वयाच्या ४० व्या वर्षी महिन्याला किमान १५,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक तुम्हाला कमीत कमी ६५ वर्षांपर्यंत चालू ठेवावी लागते म्हणजेच एकूण २५ वर्षे १५,००० रुपयांची गुंतवणूक करत राहावं लागतं.
यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ४५,००,००० रुपये असेल. यावर १० टक्के दरानं व्याज मिळाल्यास व्याजातून १ कोटी ५५ लाख ६८ हजार ३६५ रुपये मिळतील. अशा परिस्थितीत ४५,००,००० + १,५५,६८,३५६ = २,००,६८,३५६ हा एकूण निधी असेल.
तुम्हाला २,००,६८,३५६ रुपयांपैकी ६०% म्हणजे १,२०,४१,०१३ रुपये एकरकमी मिळतील आणि ४० टक्के रक्कम म्हहणजेच ८०,२७,३४२ अॅन्युइटीमध्ये गुंतवावे लागतील. जर तुमच्या अॅन्युइटीच्या गुंतवणुकीवर ८% परतावा गृहीत धरला तर त्यानुसार तुम्हाला दरमहा ५३, ५१६ रुपये पेन्शन म्हणून मिळतील.